राष्ट्रीय महामार्ग 548  न्हावरा – केडगाव – चौफुला या रस्त्याचे रुंदीकरण आणि विस्तारीकरणासाठी 250 कोटी रुपये निधीस मान्यता

दौंड – राष्ट्रीय महामार्ग 548  न्हावरा – केडगाव – चौफुला या रस्त्याचे रुंदीकरण आणि विस्तारीकरणासाठी 250 कोटी रुपये निधीस मान्यता मिळाली आहे. दौंडचे आमदार राहुल कुल (Daund MLA Rahul Kul) यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे काम तातडीने सुरू करण्याबाबत मागणी  केली होती .(Approval of Rs 250 crore fund for widening and widening of National Highway 548 Nhawara – Kedgaon – Chauphula).

राष्ट्रीय महामार्ग 548  न्हावरा – केडगाव – चौफुला या रस्त्याचे रुंदीकरण आणि विस्तारीकरणाचे काम तातडीने हाती घेण्यात यावे यासाठी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री  नितीन गडकरी यांची भेट आमदार राहुल कुल  यांनी नुकतीच दिल्ली येथे भेट घेतली होती. त्यांच्या मागणीनुसार या रस्त्यासाठी सुमारे २५० कोटी रुपयांच्या निधीस मान्यता मिळाली असुन सदर कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामाला प्रत्यक्ष सूरूवात होत आहे.

या रस्त्याच्या कामासंदर्भात आमदार राहुल कुल यांनी नुकतीच कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग, पुणे  धनंजय देशपांडे, सहाय्यक अभियंता  रुचा बरडकर, सहाय्यक अभियंता  आदेश देशपांडे, प्रकल्प व्यवस्थापक अनिल दळवी यांचे समवेत बैठक पार पडली. या मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून गंभीर अपघातांचे प्रमाण देखील वाढत आहे हे लक्षात घेता काम लवकारात लवकर हाती घ्यावे, कामाचा दर्जा राखावा, तसेच काम करताना नागरिकांची गैरसोय होऊ नये या बाबत दक्षता घ्यावी अशा सूचना आमदार राहुल कुल यांनी संबंधितांना दिल्या आहेत.