Ajit Pawar | लोकसभा निवडणुक ही गावकीची भावकिची नाही.., अजित पवारांचे मतदारांना भावनिक न होण्याचे आवाहन

Ajit Pawar | कोणत्याही भावनिकतेला बळी पडू नका. खोट्या प्रचाराला बळी पडू नका. बारामतीला लीड मिळणार की नाही ते बारामतीकर सांगतील. मात्र इंदापुर, दौंड, खडकवासाला, पुरंदर आणि भोरमधून लीड मिळायला पाहिजे. असे म्हणत अजित दादांनी पुण्यात विरोधकांना ललकारलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांनी आज उमेदवारी अर्ज सादर केला. त्याआधी महायुतीची पुण्यात मोठी सभा पार पडली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, तसेच महायुतीचे आमदार आणि खासदार उपस्थित होते. त्यावेळी अजित पवार (Ajit Pawar) बोलत होते.

विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील, राहुल कुल यांच्याशी आम्ही चर्चा केली आहे. ते त्यांच्या भागात मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करतील. आपापल्या भागातील मतदारांना आपल्याकडे वळविल्यास महायुतीचा उमेदवार विजयी होण्यावाचून कोणी रोखू शकणार नाही. बारामतीला लीड मिळणार की नाही ते बारामतीकर सांगतील. असे म्हणत काही लोक निवडणूक भावनिक करण्याचा प्रयत्न करत आहेत. बनवाबनवीचे काम होत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.

दरम्यान, सध्याची लोकसभा निवडणुक ही गावकीची भावकिची नाही. तर देशाची निवडणुक आहे. त्यामुळे देश नेमका कोणाच्या हातात द्यायचा याचा विचार करावा लागणार आहे. आज फक्त सुनेत्रा पवार अर्ज भरणार आहेत. शिरूरचे शिवाजीराव आढळराव पाटील, पुण्याचे मुरलीधर मोहोळ, मावळचे श्रीरंग बारणे यांचा नंतर अर्ज भरला जाणार असल्याचेही अजित पवारांनी यावेळी सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Amol Kolhe | ‘आमच्या गावासाठी पाच वर्षांत काय केले?’ करंदी ग्रामस्थांचा अमोल कोल्हेंना थेट सवाल

Murlidhar Mohol | मनसेच्या साथीनं महायुतीचे मताधिक्य वाढणार!, मुरलीधर मोहोळ यांनी घेतली अमित ठाकरेंची भेट

Narendra Modi | मोदीजींची विकेट काढायला विरोधकांकडे ना बॉलर ना बॅट्समन, शिंदेंचा विरोधकांवर घणाघात