IPL 2024 Schedule | आयपीएल 2024 चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर, ‘या’ दिवशी चेन्नईत होणार अंतिम सामना

IPL 2024 Schedule | भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 चे पूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. यापूर्वी केवळ 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. पहिला सामना 22 मार्च रोजी खेळला गेला, ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला होता.

आता पूर्ण वेळापत्रकानुसार आयपीएलचा अंतिम सामना 26 मे रोजी होणार आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखांमुळे आयपीएलचे पूर्ण वेळापत्रक जाहीर झाले नाही. आता निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून, आयपीएलचे पूर्ण वेळापत्रकही जाहीर झाले आहे.

लीग टप्प्यातील शेवटचा सामना 19 मे रोजी होणार आहे.
आयपीएल 2024 च्या पूर्ण वेळापत्रकात, लीग सामन्यांसह, प्लेऑफ आणि फायनलच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. आयपीएल 2024 चे प्लेऑफ सामने 21 मे पासून सुरू होतील आणि आयपीएल फायनल 26 मे रोजी होणार आहे. लीग टप्प्यातील शेवटचा सामना 19 मे रोजी होणार आहे. यानंतर 20 मे रोजी सुट्टी असेल.

त्यानंतर 21 मे पासून आयपीएल 2024 चे प्लेऑफ सामने सुरू होतील. पहिला क्वालिफायर सामना 21 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. येथे 22 मे रोजी एलिमिनेटर सामना होणार आहे. 24 मे रोजी दुसरा आयपीएल क्वालिफायर सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल. 26 मे रोजी चेपॉक येथे अंतिम सामना होणार आहे.

आईपीएल 2024 चे वेळापत्रक (IPL 2024 Schedule) :-

तारीख सामना ठिकाण
22 मार्च CSK vs RCB चेन्नई
23 मार्च PBKS vs DC मोहाली
23 मार्च KKR vs SRH कोलकाता
24 मार्च RR vs LSG जयपुर
24 मार्च GT vs MI अहमदाबाद
25 मार्च RCB vs PBKS बंगळुरू
26 मार्च CSK vs GT चेन्नई
27 मार्च SRH vs MI हैदराबाद
28 मार्च RR vs DC जयपुर
29 मार्च RCB vs KKR बंगळुरू
30 मार्च LSG vs PBKS लखनऊ
31 मार्च GT vs SRH अहमदाबाद
31 मार्च DC vs CSK वाइजेग
1 एप्रिल MI vs RR मुंबई
2 एप्रिल RCB vs LSG बंगळुरू
3 एप्रिल DC vs KKR वाइजेग
4 एप्रिल GT vs PBKS अहमदाबाद
5 एप्रिल SRH vs CSK हैदराबाद
6 एप्रिल RR vs RCB जयपुर
7 एप्रिल MI vs DC मुंबई
7 एप्रिल LSG vs GT लखनऊ
8 एप्रिल CSK vs KKR चेन्नई
9 एप्रिल PBKS vs SRH मोहाली
10 एप्रिल RR vs GT जयपुर
11 एप्रिल MI vs RCB मुंबई
12 एप्रिल LSG vs DC लखनऊ
13 एप्रिल PBKS vs RR मोहाली
14 एप्रिल KKR vs LSG कोलकाता
14 एप्रिल MI vs CSK मुंबई
15 एप्रिल RCB vs SRH बंगळुरू
16 एप्रिल GT vs DC अहमदाबाद
17 एप्रिल KKR vs RR कोलकाता
18 एप्रिल PBKS vs MI मोहाली
19 एप्रिल LSG vs CSK लखनऊ
20 एप्रिल DC vs SRH दिल्ली
21 एप्रिल KKR vs RCB कोलकाता
21 एप्रिल PBKS vs GT मोहाली
22 एप्रिल RR vs MI जयपुर
23 एप्रिल CSK vs LSG चेन्नई
24 एप्रिल DC vs GT दिल्ली
25 एप्रिल SRH vs RCB हैदराबाद
26 एप्रिल KKR vs PBKS कोलकाता
27 एप्रिल DC vs MI दिल्ली
27 एप्रिल LSG vs RR लखनऊ
28 एप्रिल GT vs RCB अहमदाबाद
28 एप्रिल CSK vs SRH चेन्नई
29 एप्रिल KKR vs DC कोलकाता
30 एप्रिल LSG vs MI लखनऊ
1 मे CSK vs PBKS चेन्नई
2 मे SRH vs RR हैदराबाद
3 मे MI vs KKR मुंबई
4 मे RCB vs GT बंगळुरू
5 मे PBKS vs CSK धर्मशाला
5 मे LSG vs KKR लखनऊ
6 मे MI vs SRH मुंबई
7 मे DC vs RR दिल्ली
8 मे SRH vs LSG हैदराबाद
9 मे PBKS vs RCB धर्मशाला
10 मे GT vs CSK अहमदाबाद
11 मे KKR vs MI कोलकाता
12 मे CSK vs RR चेन्नई
12 मे RCB vs DC बंगळुरू
13 मे GT vs KKR अहमदाबाद
14 मे DC vs LSG दिल्ली
15 मे RR vs PBKS गुवाहाटी
16 मे SRH vs GT हैदराबाद
17 मे MI vs LSG मुंबई
18 मे RCB vs CSK बंगळुरू
19 मे SRH vs PBKS हैदराबाद
19 मे RR vs KKR गुवाहाटी
21 मे क्वालिफायर 1 अहमदाबाद
22 मे एलिमिनेटर अहमदाबाद
24 मे क्वालिफायर 2 चेन्नई
26 मे फाइनल चेन्नई

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Pune LokSabha 2024 | फडणवीसांच्या भेटीनंतर चक्रे फिरली; मुळीक बंधू लागले मोहोळांच्या प्रचाराला !

Pune News | पाटलांना फडणवीसांची तंबी? विधानसभेचे बघू, आधी लोकसभा उमेदवाराचा प्रचार करण्याचे निर्देश

 वरुण गांधी यांचे तिकीट कापले; भाजपचा धाडसी निर्णय