अशोक चव्हाण यांनी हाती घेतलं ‘कमळ’, फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात केला प्रवेश

Ashok Chavan Joins BJP: काँग्रेसचे मातब्बर नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला आहे. नांदेड येथील भाजपा कार्यलयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, प्रविण दरेकर आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांनी हाती कमळ घेतले आहे. अशोक चव्हाण भाजपामध्ये गेल्याने नांदेडमध्ये भाजपा आणखी मजबूत बनले आहे. अशोक चव्हाण यांच्यासह माजी आमदार अमर राजूरकर यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

दरम्यान अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. लोकसभा निवडणुकीच्या आधी ही महत्त्वाची घडामोड घडली आहे. काँग्रेसला महाराष्ट्रात खिंडार पडायला सुरुवात झाली आहे असंच यामुळे म्हणता येईल.

महत्वाच्या बातम्या-

अशोक चव्हाणांनी राजीनामा देताच Ramdas Athawale यांची मोठी ऑफर; म्हणाले, रिपल्बिकन पक्षात…

“काँग्रेस लोकशाही वाचवण्याची लढाई लढत असताना, सगळं काही दिलेले नेते..”, नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया

“कोणाबद्दल मी तक्रार करणार…”, आमदारकीच्या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया