पैलवान हीच आमची जात, कुस्तीला जातीय रंग देऊ नका – अस्लम काझी  

Aslam kazi : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा या पुणे येथे नुकत्याच पार पडल्या. सिकंदर शेख मुळे या महाराष्ट्र केसरी स्पर्धा राज्यभर गाजल्या. सोशल मीडियावर महाराष्ट्र केसरी स्पर्धांबाबत अनेक सकारात्मक व नकारात्मक बाजू समोर आल्या. आता राज्यात कुस्ती सम्राट म्हणून ओळख असलेले सोलापूर जिल्ह्यातील कुर्डवाडी येथे वास्तव्यास असलेले अस्लम काझी यांनी या स्पर्धेबाबत, कुस्तीबाबत तसेच सिकंदर बाबत आपले मत व्यक्त केले आहे.

ते म्हणाले, मी स्वत: मुसलमान असून गेल्या 20 वर्षांपासून कुस्ती क्षेत्रात आहे. मला ज्याने तालीम बांधून दिली तो व्यक्ती मारवाडी समाजाचा आणि माझ्या तालमीचं नाव छत्रपती शिवराय कुस्ती संकुल कारण इथे प्रत्येक जाती-धर्माचा माणूस असतो. कुस्ती हा कोणत्या जातीचा खेळ नाही त्यामुळे अशा प्रकरणांना जातीय रंग देऊ नका, असं आवाहन अस्लम काझी यांनी केलं आहे.

सिकंदर शेख प्रकरणामध्ये जातीय रंग दिला जात असून पैलवान हीच आमचीज जात असते. अस्लम काझी असो नाहीतर सिकंदर यांच्यावर कोणती धर्म नाहीतर सर्व जातीचे लोक प्रेम करतात. रोज बजरंग बलीचं नाव घेऊन आम्ही पाया पडतो आणि त्याची सेवा करत आखाड्यात उतरत असल्याचं अस्लम काझी म्हणाले.

मी याबाबत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पंचांशी बोललो तर त्यांचंदेखील म्हणणं आहे की महेंद्रला 2 तर सिकंदरला 1 गुण द्यायला हवा होता, त्यामुळे दोन गुणांची पार्शलिटी झाली. पण ती जाणीवपूर्वक नाही तर अनावधानाने किंवा गडबडीत झालेली चूक असल्याचं अस्लम काझी यांनी म्हटलं आहे.