Dilip Walse Patil | ऐन लोकसभेच्या तोंडावर दिलीप वळसे पाटील यांचा अपघात, हात फ्रॅक्चर झाला

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024) वारे वाहत आहे. अशातच ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांचा अपघात झाला आहे. घरातच पाय घसरुन पडल्याने दिलीप वळसे पाटील यांच्या खुब्याला मार लागला आणि हाथ फ्रॅक्चर झाला आहे. पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात येणार आहे. या रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया (Surgery) पार पडणार आहे.

काल रात्री राहत्या घरात पडल्यामुळे मला फ्रॅक्चर झाले असून डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार सुरू आहेत. काही काळ पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. लवकरच बरा होऊन आपल्या समवेत सामाजिक कामात सक्रिय होईल, अशी माहिती ट्विटद्वारे दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी दिली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

पुणे तिथे काय उणे? पुण्यासाठी मोहोळ, धंगेकर, मोरे आले एकत्र

Prakash Ambedkar | वंचितला अजून पाठींबा दिलेला नाही, मनोज जरांगेंनी फेटाळला प्रकाश आंबेडकरांचा दावा

Mumbai LokSabha | मुंबईतील सहापैकी चार लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडे, कोणा कोणाला मिळालं तिकीट?