Aus vs Pak सामन्यात स्टेडियममध्ये रोमान्स करताना दिसले कपल, video पाहून क्रिकेटर्सही चकित

Australia vs Pakistan Couple romance video: मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया (Pakistan vs Australia) यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 6 गडी गमावून 187 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने सर्वाधिक 96 धावा केल्या. यादरम्यान तो आपले शतक पूर्ण करू शकला नाही.

पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 318 धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ 264 धावांवर गारद झाला. पहिल्या डावाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 54 धावांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची सुरुवात खूपच खराब झाली. 16 धावांवर संघाने चार विकेट गमावल्या होत्या. उस्मान ख्वाजा आणि ट्रॅव्हिस हेड यांना खातेही उघडता आले नाही.

लाइव्ह सामन्यात रोमान्स
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी असे काही घडले ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. वास्तविक, स्टेडियममध्ये लाईव्ह मॅचदरम्यान एक कपल रोमान्स करताना दिसले. जेव्हा कॅमेरामनने या जोडप्याला मोठ्या स्क्रीनवर दाखवले तेव्हा मुलगी त्या मुलाच्या मांडीवर झोपली होती. आपण कॅमेरावर दिसत असल्याने पाहिल्यानंतर दोघेही तोंड लपवताना दिसले.

व्हिडिओ व्हायरल होत आहे
या कपलचा रोमान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर चाहते सतत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. स्टेडियममध्ये यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. मोठ्या पडद्यावर स्वत:ला पाहून हे जोडपे तिथे उपस्थित लोकांना टाळताना दिसले. मोठ्या पडद्यावर या जोडप्याचा रोमान्स पाहून तेथे उपस्थित सर्व खेळाडू आश्चर्यचकित झाले.

महत्वाच्या बातम्या-

विरोधकांना जनता ४४० व्होल्टचा करंट लावणार; चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास

रामदास आठवले यांनी तळागाळातील वंचित घटकांसाठी केलेले कार्य प्रेरक आहे – देवधर

मला या स्थितीत आणण्यासाठी खूप धन्यवाद..; कुस्तीपटू विनेश फोगटने पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार केले परत