‘जिल्हा परिषदे’च्या शाळांमध्येही मिळणार आता दिल्लीच्या धर्तीवर शिक्षण

zp school

मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आणखी चांगल्या पद्धतीचे शिक्षण मिळावे याकरिता महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार प्रयत्न करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून दिल्ली निगमच्या शाळांच्या धर्तीवर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे याकरिता राज्यमंत्री सत्तार आग्रही होते. यासंदर्भात त्यांनी ग्रामविकास विभागाला प्रस्तावही पाठविला होता. त्यानंतर ग्रामविकास विभागाने यासाठी सात तज्ज्ञांच्या अभ्यास गटाची स्थापना केली असून दिल्लीच्या शैक्षणिक कार्य पद्धतीवर ते अभ्यास करणार आहेत. त्यामुळे सत्तार यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचे चांगले शिक्षण मिळाले पाहिजे, असाही राज्यमंत्री सत्तार यांचा मानस आहे.

आजच्या स्पर्धात्मक युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही प्रगत तंत्रज्ञानासह जगातील सर्व अत्याधुनिक शिक्षण मिळणे गरजेचे आहे. दिल्ली निगमच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी काळानुरूप मोठ्या प्रमाणावर बदल व सुधारणा झाल्या आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्याकरिता वापरण्यात येणारे तंत्रज्ञान, विद्यार्थी व शिक्षकांकरिता असणाऱ्या सुविधा, विद्यार्थ्यांचे आचार-विचार व शिस्त, शिक्षकांची शिकवण्याची कार्यपद्धती याचा सखोल अभ्यास तज्ज्ञ मंडळी करणार असून त्याचा अहवाल राज्य सरकारला ते सादर करतील.

दिल्ली निगमच्या शाळांच्या शैक्षणिक पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी ग्रामविकास विभागाने सात तज्ज्ञांच्या अभ्यास गटाची स्थापना केली आहे. त्यात औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटने, औरंगाबाद जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण, सेवानिवृत्त विशेष लेखा परिक्षक सहकारी संस्था आर.एस. शेख, फर्दापूर येथील सहशिक्षक काशिनाथ पाटील, अहमदनगर जिल्ह्यातील राहाता पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी पोपट काळे, औरंगाबाद जिल्ह्यातील वरूर तालुका सिल्लोड येथील सहशिक्षक जगन सुरसे आणि औरंगाबाद जिल्ह्यातील वडगाव कोण्हाटी येथील मुख्याध्यापक सुनीलची चिपाटे यांचा समावेश आहे.

Previous Post
aalia

‘कन्यादान’च्या नवीन आयडियावरुन आलिया भट्ट ट्रोल, हिंदू धर्माचा अपमान केल्याने नेटकरी संतापले !

Next Post
aashish shelar

राज्यात ‘तक्रारदार स्थानबद्ध आणि गावगुंड राज्यभर मुक्त’, अशी स्थिती निर्माण झाली आहे – शेलार

Related Posts
Nupur Sharma

‘… तर लवकरच भाजप नुपूर शर्मा यांना मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार बनवू शकते’

नवी दिल्ली – AIMIM प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारला (Central Government)…
Read More
Uddhav Thackeray | मंत्री असून देखील शिंदेंना झेडप्लस सुरक्षा नाकारली, शिवसेना प्रवक्ते राजू वाघमारेंचा उद्धव ठाकरेंवर आरोप

Uddhav Thackeray | मंत्री असून देखील शिंदेंना झेडप्लस सुरक्षा नाकारली, शिवसेना प्रवक्ते राजू वाघमारेंचा उद्धव ठाकरेंवर आरोप

मुंबई | महाविकास आघाडी सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ज्येष्ठ सहकारी आणि मंत्री एकनाथ शिंदे…
Read More
संप मागे : एसटी कामगारांच्या रेट्यापुढे सरकार झुकले; मागण्या मान्य!

संप मागे : एसटी कामगारांच्या रेट्यापुढे सरकार झुकले; मागण्या मान्य!

मुंबई : एसटी महामंहाडळ कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासंदर्भात पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभुमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त…
Read More