अधिक व्याज हवे आहे, मग पोस्टाची ही योजना जरूर वाचा

मुंबई : अनेकदा आपण बँकेत पैसे गुंतवितो पण आपणास तितकासा परतावा मिळत नाही. या योजनेमध्ये पैसे गुंतवा आणि बँकेपेक्षा आधिल व्याज मिळवा. अनेकजण निवृत्ती नंतर त्यांना मिळालेल्या पैशांची एफडी करतात, त्यांना जे व्याज मिळतेत्यावर ते त्यांचा घरखर्च चालवितात.पण कोरोना काळात अनेक बँकांनी त्यांचे व्याजदर कमी केले आहेत.त्यामुळे परतावा देखील कमी मिळत आहे. परतावा कमी मिळाल्यामुळे घर खर्चाचे गणित कोलमडते.

बँकेपेक्षा जर तुम्ही पोस्टामध्ये गुंतवणूक केली तर नक्कीच तुम्हाला अधिक व्याज मिळेल. पोसतामध्ये देखील मुदत ठेव योजना असते. या योजनेद्वारे तुम्ही एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष किंवा पाच वर्ष पैसे गुंतवणूक करू शकता. बँकेत तुम्हाला 5.5 टक्के इतका व्याजदर मिळतो पण मात्र पोस्टात तुम्हाला 6.7 टक्के व्याजदर मिळतो. यामध्ये तुम्ही अगदी एक हजारांपासून ते अगदी लांखापर्यत पैसे गुंतवणूक करू शकता. तुम्हाला 6.7 टक्के व्याजदर तर मिळतोच पण याबरोबरच तुम्हाला मुदत पूर्ण केल्यानंतर चांगला परतावा मिळतो.

जर तुम्हाला मुदती नंतर अजून देखील पैसे अधिक काळ ठेवायचे असतील तरी देखील तुम्ही पैसे ठेवू शकता. पोस्टात पैसे गुंतवणूक केल्या नंतर तुम्हाला इन्कम टॅक्समध्ये देखील सूट मिळते. पोस्टाची ठेव अतिशय सुरक्षित मानली जाते.त्यामुळे बँकेपेक्षा पोस्टात पैसे गुंतविणे कधीही योग्य ठरते. तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी तुम्ही पैसे गुंतवणूक करू शकता. तुमच्या जवळच्या पोस्टात किंवा ऑनलाइन देखील तुम्हाला पोस्टाच्या योजना माहीत होऊ शकतात.

हे देखील पहा