Kohli-Ganguly Captaincy Controversy: “कोहली आणि गांगुलीत अहंकाराची लढाई…”, संघ निवडकर्ता चेतन शर्मांचा मोठा दावा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय, BCCI) मुख्य संघ निवडकर्ता चेतन शर्मा (Chetan Sharma) मोठ्या विवादात सापडले आहे. चेतन शर्मा यांनी एका टीव्ही चॅनलद्वारे केल्या गेलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये (Sting Operation) भारतीय संघ आणि खेळाडूंबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. यादरम्यान त्यांनी कोहली आणि गांगुली (Kohli-Ganguly Controversy) यांच्यातील कर्णधारपदाच्या विवादावरही पडदा टाकला आहे. ज्यामुळे मोठा विवाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेने एका वृत्तवाहिनीच्या हवाल्याने या संपूर्ण घटनेची माहिती दिली आहे. माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्यात अहंकाराची लढाई असल्याचा आरोप चेतन शर्मांनी केला आहे.

ते म्हणाले की, “कोहलीच्या कसोटी कर्णधारपदाच्या विवादाबाबत सांगायचे झाल्यास, सौरव गांगुलीमुळे आपल्याला कर्णधारपद गमवावे लागले, असे कोहलीला वाटत होते, पण तसे नाही. त्याच्या कर्णधारपदावरुन पायउताराच्या निर्णयावेळी निवड समितीच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये बरेच लोक होते. तेव्हा गांगुली कोहलीला म्हणाला होता की, तू घेतलेल्या निर्णयाचा अजून एकदा विचार करा. परंतु मला वाटते की कोहलीने गांगुलीचे म्हणणे ऐकले नाही.”