‘तुस्सी कमाल कर दित्ता’ : भगवंत मान यांचा शपथविधी होणार शहिद भगतसिंग यांच्या गावी !

पंजाब : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज लागले. गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तरप्रदेश, उत्तराखंड या पाच राज्यांतील निकाल लागले असून पंजाब सोडता बाकीच्या चार राज्यात भाजपाने आघाडी मारली आहे. तसंच पंजाबमध्ये कॉंग्रेसच निवडून येण्याची दाट शक्यता असताना तिथे आम आदमी पार्टीने आघाडी घेतल्याने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार पंजाबमध्ये यावेळी जनतेने ‘आप’ला पसंती दिली आहे. तर काँग्रेसची सपशेल पिछेहाट झाली आहे. निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार पंजाबमध्ये आपचे तब्बल ९२ उमेदवार आघाडीवर आहेत. तर यावेळी काँग्रेसला मोठा फटका बसला असून, राज्यात सत्तेत असणाऱ्या काँग्रेसने केवळ १९ जागांवर आघाडी घेतली आहे. आता आपचे भगवंत मान हे पंजाबचे मुख्यमंत्री होणार आहेत.

दरम्यान, सरदार भगतसिंग यांची जन्मभूमी असलेल्या खटकरकलनमध्ये भगवंत मान शहीद आझम मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे वृत्त आहे. पंजाबमध्ये बंपर विजय मिळवल्याबद्दल आपचे निमंत्रक आणि प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी भगवंत मान यांचे अभिनंदन केले आहे. अरविंद केजरीवाल यांनी भगवंत मान यांना फोन करून त्यांचे आणि पक्षाच्या विजयाचे अभिनंदन केले.

या विजयानंतर पंजाबचे होणारे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांनी कामाचा धडाका सुरु केला आहे. त्यांनी पंजाबमधी सरकारी कार्यालयात आता इथून पुढे मुख्यमंत्र्याचा फोटो लागणार नाही. सरकारी कार्यालयात सरदार भगतसिंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावण्यात येईल. अशी घोषणा मान यांनी केली आहे.