Rajya Sabha Elections | एकनाथ शिंदेंकडून मिलिंद देवरांना राज्यसभेची उमेदवारी

BJP Candidates For Rajya Sabha Biennial elections : महाराष्ट्रात आगामी राज्यसभा निवडणुकीच्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे. आज दुपारी शिवसेना शिंदे गटाकडून राज्यसभेसाठी मिलिंद देवरा (Milind Deora) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मिलिंद देवरा यांनी जानेवारी २०२४ मध्ये काँग्रेसमधून राजीनामा देत शिंदे गटात प्रवेश केला होता.

दुसरीकडे भाजपाकडून राज्यसभेसाठी ३ जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजीत गोपछडे यांना भाजपानं महाराष्ट्रात राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. अशाप्रकारे महायुतीकडून आतापर्यंत चार उमेदवारांची घोषणा झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष शेलार…; भाजप प्रवेशानंतर बोलताना अशोक चव्हाणांकडून चूक, फडणवीसही हसून बेजार

छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजन समाजाचे राजे, Chhagan Bhujbal यांचे मोठे वक्तव्य

Rajya Sabha Elections | राज्यसभेसाठी शरद पवार मास्टरस्ट्रोक मारण्याच्या तयारीत, छत्रपती शाहू महाराजांना देणार उमेदवारी!