काँग्रेसला मोठा धक्का; तब्बल चार दिग्गज नेत्यांनी केला भाजपमध्ये प्रवेश

चंदीगड – पंजाबमध्ये काँग्रेसला (Congress in Punjab) मोठा धक्का बसला असून, काँग्रेसचे चार ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्र्यांनी शनिवारी येथे भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये दाखल झालेल्या या नेत्यांमध्ये राजकुमार वेरका, बलबीर सिंग सिद्धू, सुंदर शाम अरोरा आणि गुरप्रीत सिंग कांगर (Rajkumar Verka, Balbir Singh Sidhu, Sundar Sham Arora and Gurpreet Singh Kangar) यांचा समावेश आहे. बर्नाला येथील काँग्रेसचे माजी आमदार केवल ढिल्लन आणि शिरोमणी अकाली दल (एसएडी)चे माजी आमदार सरूप चंद सिंगला आणि मोहिंदर कौर जोश यांनीही भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला.

केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत (Union Minister Gajendra Singh Shekhawat) आणि सोमप्रकाश, पक्षाचे राज्य युनिट प्रमुख अश्विनी शर्मा आणि पक्षाचे वरिष्ठ नेते- दुष्यंत गौतम, तरुण चुघ, सुनील जाखर आणि मनजिंदर सिंग सिरसा यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मोहालीचे तीन वेळा आमदार असलेले बलबीर सिद्धू हे मागील काँग्रेस सरकारमध्ये आरोग्यमंत्री होते, तर रामपुरा फूलचे तीन वेळा आमदार राहिलेले गुरप्रीत कांगार महसूल मंत्री होते.