बहिणीच्या लग्नात मेव्हण्याने केली मारहाण… बिग बॉस फेम अभिनेत्रीसोबत धक्क्कादायक प्रकार

बिग बॉस 16 ची स्पर्धक आणि राजस्थानची शकीरा उर्फ ​​गोरी नागोरी (Gori Nagori) हिच्यावर तिच्याच बहिणीच्या लग्नात जीवघेणा हल्ला (Gori Nagori Attacked) झाला आहे. गोरीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एका व्हिडिओमध्ये ही माहिती दिली आहे. तिने सांगितले की तिच्याच मेव्हण्याने तिच्यावर आणि तिच्या टीमवर हल्ला केला. यासोबतच आपल्या जीवाला धोका आहे, आपल्याला काही झाले तर त्याला आपला मेहुणा जबाबदार असेल असेही गोरीने म्हटले आहे.

गोरी नागोरीने एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो एका लग्नाचा आहे. यामध्ये काही लोक लाथा मारताना आणि मुक्का मारताना तसेच खुर्ची घेऊन हल्ला करताना दिसत आहेत. यानंतर खुद्द गोरी तिच्या व्यथा मांडताना दिसत आहे. तिने राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना मदतीची विनंती केली आहे.

गोरी नागोरीने व्हिडिओ शेअर केला आहे
गोरीने तिच्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “नमस्कार मित्रांनो, मी तुमची गोरी आहे आणि आज माझ्यासोबत जे घडले ते कुणासोबत घडू नये, म्हणून मी हा व्हिडिओ अपलोड करत आहे. मित्रांनो 22 मे रोजी माझ्या बहिणीचे लग्न होते. मी मेर्ट शहरात राहते आणि मला वडील आणि भाऊ नाहीत. तर माझा एक मोठा मेहुणा जावेद हुसेन आहे, त्याने सांगितले की, तू किशनगडमध्ये आमचे लग्न कर, मी सर्व व्यवस्था करीन. त्यांच्या सांगण्यावरून मी किशनगडमध्ये लग्न केले आणि हा सगळा कट होता हे मला माहीत नव्हते. किशनगड येथे बोलावून माझ्यावर व माझ्या टीमवर माझ्या मेव्हण्याने व त्याच्या मित्र भावाने अतिशय वाईट हल्ला केला आणि मी तक्रार करण्यास गेले असता पोलिसांनी माझी तक्रार घेतली नाही. घरगुती बाब आहे, घरीच सोडवा असे सांगितले आणि पोलिसांनी मला बराच वेळ बसवून ठेवले आणि सेल्फी घ्या असे सांगितले.”

गोरीने पुढे लिहिले की, “घरातील मी एकटी मुलगी आणि माझी आई आहे आणि आम्हाला या सर्व लोकांपासून धोका आहे. माझ्या आयुष्याला, मला, आईला, माझ्या टीमला काही झालं तर त्याला हे लोक जबाबदार असतील. मी व्हिडिओमध्ये ज्यांची नावे घेतली आहेत आणि मी फक्त राजस्थानच्या लोकांना मला पाठिंबा देण्याचे आवाहन करणार आहे. राजस्थान सरकार सर अशोक गेहलोत जी आणि सचिन पायलट जी यांनी मला पाठिंबा द्यावा आणि लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा आणि जो कोणी दोषी असेल त्याला शिक्षा व्हावी, माझ्या जीवाला धोका आहे, राजस्थान सरकारकडून हीच माझी इच्छा आहे.”