‘तुम्ही लुटणार आणि महाराष्ट्राची जनता बघत बसणार असं होणार नाही’

मुंबई – राज्यात केंद्रीय तपास यंत्रणा सक्रीय झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यातूनच राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील होताना दिसून येत आहेत. नुकतीच काँग्रेसचे (congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांचे वकील वकील सतीश उके (satish uke) यांच्या घरावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी सकाळी छापेमारी केली. मात्र ही छापेमारी राजकीय हेतूने केल्याचा आरोप नाना पटोले यांनी केलाय.

यावरच उत्तर देताना किरीट सोमय्या यांनी कागदपत्रांशिवाय ईडी कारवाई करत नाही असं सांगितलं आहे. याचवेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांच्यासहीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही उल्लेख करत जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना प्रकरणामध्ये झालेल्या कारवाईचा संदर्भ दिला. यावेळी सोमय्या यांनी संपूर्ण पवार कुटुंब ग्लिसरीन घेऊन रडत होतं, अशी खोचक टीका केलीय.

अजित पवारांचा जरंडेश्वर जप्त झाला ना?, न्यायालयाने मान्यता दिली ना? शरद पवार पण रडत होते. ग्लिसरीनची बॉटल घेऊन सगळे पवार लाईनमध्ये उभे होते टीव्हीवर. सगळ्या चॅनेलवर. कधी सुप्रिया सुळे रडताना दिसायच्या. कधी त्यांच्या ताई कधी कुणाची माई, कधी कुणाची बायको, कुणाचा मुलगा.. सगळे लाईनीत पवार. सदनभर पवार रडत होते ग्लिसरीनच्या बॉटल वापरुन,” असा टोला सोमय्यांनी लगावला. “का ओ? आता न्यायालयाने दिलं ना. अजित पवारांवर बेनामी संपत्तीच्या अंतर्गत पण चौकशी सुरु आहे. तुम्ही लुटणार आणि महाराष्ट्राची जनता बघत बसणार असं होणार नाही,” असंही सोमय्या म्हणाले.