“राम मंदिर लोकार्पणासाठी VVIPना निमंत्रण, उद्धव ठाकरे साधे पहिल्या टर्मचे MLC”; भाजपचा टोला

Uddhav Thackeray: २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्या येथील राम मंदिरात भगवान श्रीरामांचा प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. राम मंदिराच्या लोकार्पणासाठी देशभरातील मान्यवारांना निमंत्रणे पाठवण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण नसल्याचा दावा केला जात आहे. यावरुन भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी ठाकरेंवर टीका केली आहे.

अयोध्येतील राम मंदिराचे (Ayodhya Ram Mandir) लोकार्पण सोहळ्यासाठी देशातील व्हीव्हीआयपी व्यक्तींनाच निमंत्रित करण्यात आले आहे. जवळपास आठ ते साडेआठ हजार लोकांना निमंत्रित करण्यात आले आहे. केंद्राच्या व्हीव्हीआयपी यादीत उद्धव ठाकरे नाव नसेल. उद्धव ठाकरेंचं अयोद्धेच्या राम मंदिराच्या उभारणीत काय योगदान हे सर्वांना माहिती आहेत. ते साधे एमएलसी तेही पहिल्या टर्मचे आहेत. त्यामुळे कदाचित केंद्राच्या व्हीव्हीआयपींच्या लिस्टमध्ये ते नसतील किंवा आणखी काही कारण असेल, अशी खोचक टीका महाजन यांनी केली.

पुढे बोलताना महाजन म्हणाले, घरी बसून भूमिका घेण्यात आणि प्रत्यक्ष करण्यात फरक आहे. आम्ही २० दिवस जेलमध्ये होते. संजय राऊत, उद्धव ठाकरे त्यावेळी कुठे होते? संजय राऊतांनी, उद्धव ठाकरेंनी कारसेवेचा एखादा फोटो दाखवावा, असे आव्हान गिरीश महाजन यांनी दिले. तसेच बाळासाहेब ठाकरेंच्या भूमीकेबाबत दुमत नाही. मात्र उद्धव ठाकरे आयत्या बिळावरचे नागोबा आहेत. त्यांचे काही योगदान नाही, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली.

महत्वाच्या बातम्या-

ठाकरेंनी कोरड्या विहिरीत उडी मारायला लावली तरी मारेन; लोकसभेबाबत अंबादास दानवे स्पष्टच बोलले

शेअर मार्केटमध्ये महिन्याभरात कमावले ६५० कोटी, ‘या’ महिलेची अविश्वसनीय कामगिरी

40 लाखांची साडी आणि 100 कोटींची कार, असे आहे Neeta Ambani यांचे विलासी जीवन