BJP | लीड द्या आणि पुन्हा आमदारकी मिळवा, लीड नाही दिलं त्याचं तिकीट धोक्यात; भाजपचे नवे धोरण

भाजप (BJP) यंदा ‘ अबकी बार ४०० पार ‘ या लक्ष्यासह लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. महाराष्ट्रातून महायुती सरकारला ४५ पेक्षा जागा मिळवण्याचा निर्धार भाजपने केला आहे. त्यासाठी भाजपने आमदारांसाठी नवे धोरण आणले आहे.

‘एबीपी माझा’च्या वृत्तानुसार, लोकसभेत महायुतीच्या उमेदवाराला लीड मिळवून द्या, मगच आमदारकीचे तिकीट मिळवा, असा अल्टिमेटम भाजपने (BJP) आपल्या आमदारांना दिला आहे. त्यामुळे लोकसभेच्या उमेदवाराबाबत मतभेद असले तरीही आपली आमदारकीची खुर्ची वाचवण्यासाठी विद्यमान आमदाराना मेहनत घ्यावी लागणार आहे.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे भाजप नेत्यांनी विधानसभा आमदारांना नुसतं टार्गेटच दिलं नाही तर त्यानुसार प्रत्येकाचं रिपोर्ट कार्डच तयार केलं जाणार आहे. त्यांच्या मताधिक्याचा उमेदवाराला कसा फायदा झाला, याचं मूल्यमापन यावेळी केले जाणार आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी विधानसभा आमदार आणि इच्छुक उमेदवारांना तशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पुन्हा आमदारकीचं स्वप्न पाहायचं असेल, तर आतापासूनच जोमाने कामाला सुरुवात करावी लागणार आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Amol Kolhe | ‘आमच्या गावासाठी पाच वर्षांत काय केले?’ करंदी ग्रामस्थांचा अमोल कोल्हेंना थेट सवाल

Murlidhar Mohol | मनसेच्या साथीनं महायुतीचे मताधिक्य वाढणार!, मुरलीधर मोहोळ यांनी घेतली अमित ठाकरेंची भेट

Narendra Modi | मोदीजींची विकेट काढायला विरोधकांकडे ना बॉलर ना बॅट्समन, शिंदेंचा विरोधकांवर घणाघात