छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक तयार केली; मोदींनी त्यावर कळस चढवला – चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील यांचे अजब वक्तव्य

पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नेहमीच चर्चेत असतात. मात्र त्यांच्या आता एका अजब विधानाने नवा वाद उभा राहिला आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक तयार केली; वाजपेयी, मोदींनी त्यावर कळस चढवला’ असं अजब वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. ते पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत तिकीट कापण्याबाबत ते बोलत होते.

तिकीट पक्षाचं असतं त्यामुळे माझं तिकीट कापलं हा शब्दप्रयोगच चुकीचा आहे. तिकीट पक्षाचं असतं, व्होट बँक पक्षाची असते. तुमचं कर्तृत्व पाहून पक्ष तुम्हाला उमेदवारी देत असतो. व्होट बँक ही वर्षानुवर्षे मेहनत घेऊन तयार केलेली असते. असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

‘ही व्होट बँक संत, मंहतांपर्यंत, छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचते. त्यांनी ही हिंदुत्वाची व्होट बँक विकसित केली. अलीकडच्या काळात अटल बिहारी वाजपेयी, आडवाणी, नरेंद्र मोदी आणि सर्वांनी त्यावर कळस चढवला. ती व्होट बँक तुम्हाला मिळते, त्यासाठी तुमचा चेहरा, गाव थोडंसं उपयोगी पडतं. अन्यथा ते तिकीटही, उमेदवारही आणि व्होट बँकही पक्षाची आहे’. चंद्रकांत पाटील यांच्या या अजब विधानावरून आता नवा वाद उभा राहिला आहे.

हे देखील पहा