‘राज्यात अनैतिक युती करून महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं’

दौंड – आजचे आंदोलन हे या आघाडी सरकारला आपण देत असलेला इशारा आहे .आज नऊ दिवस झाले संपूर्ण राज्यातील विद्युत पुरवठा या सरकारने बंद केला आहे . अनैतिक युती करून हे सरकार सत्तेत आलेलं आहे. राज्यात अलिबाबा आणि ४० चोरांची टोळी सत्तेत आलेली आहे असा घणाघाती आरोप भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष वासुदेव काळे यांनी केला .

वीज पंपाची वीज तोडु नये , तोडलेली वीज कनेक्शन तातडीने जोडावेत , शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात येऊ नये या मागण्यांसाठी भाजपा किसान मोर्चा चे प्रदेश अध्यक्ष वासुदेव काळे यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरण कार्यालय दौंड येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले . भाजपा किसान मोर्चा च्या वतीने हे आंदोलन करण्यात आले . यावेळी काळे हे बोलत होते .

आटली की बाटली कचकन फुटली … वीज पुरवठा खंडित करायला लाज नाही वाटली …खंडित वीज पुरवठा सुरू झालाच पाहिजे… शेतकरी एकजुटीचा विजय असो , एकच चर्चा किसान मोर्चा , अरे कोण म्हणतो देत नाय … घेतल्याशिवाय राहत नाही अशी घोषणाबाजी या आंदोलना वेळी आंदोलकांनी केली.

हे देखील पहा 

https://www.youtube.com/watch?v=3AmlxDP4tcU

You May Also Like