Rajasthan : राजस्थानमध्ये कॉंग्रेसचा टांगा झाला पलटी; भाजपची विजयाच्या दिशेने वाटचाल

Rajasthan Election Result 2023 Live : मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगण या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला काही वेळापूर्वीच, आठ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. निवडणूक आयोगानं मिझोरम विधानसभेच्या मतमोजणीच्या वेळापत्रकात बदल केल्यानं तिथं आज ऐवजी उद्या मतमोजणी होणार आहे.

आता पर्यंत हाती आलेल्या वृत्तानुसार, भाजपने मध्य प्रदेशात मोठी आघाडी घेतली आहे. राजस्थानात देखील भाजप आघाडीवर आहे. तेलंगणात काँग्रेस 64 धावांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे, एक्झिट पोलने छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या विजयाचा अंदाज वर्तवला होता. परंतु सध्याच्या ट्रेंडवरून भाजप काँग्रेसपेक्षा किरकोळ पुढे आहे. रिपोर्ट्सनुसार, भाजप 45 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस 44 जागांवर आघाडीवर आहे. राज्यात बहुमताचा आकडा 46 आहे.

दरम्यान, राजस्थान विधानसभा निवडणुकीची मतमोजणी (Rajasthan Assembly Election Results) सुरू झाली आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये विरोधी पक्षात असलेला भारतीय जनता पक्ष (BJP) बहुमतासह सत्तेत परतताना दिसत आहे. भाजप 117 जागांवर आघाडीवर आहे. ताज्या ट्रेंडनुसार सत्ताधारी काँग्रेस 66 जागांवर आघाडीवर आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे ताज्या ट्रेंडवरून राजस्थान राज्यातील काँग्रेस पक्ष सत्तेतून बाहेर पडण्याचे संकेत मिळत आहेत.

महत्वाच्या बातम्या-