Telangana निवडणुकीत माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन याचं काय झालं?

Election Result 2023 Live : मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगण या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला काही वेळापूर्वीच, आठ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. निवडणूक आयोगानं मिझोरम विधानसभेच्या मतमोजणीच्या वेळापत्रकात बदल केल्यानं तिथं आज ऐवजी उद्या मतमोजणी होणार आहे.

सकाळी साडे दहा वाजेपर्यंत भाजपने मध्य प्रदेशात मोठी आघाडी घेतली आहे. राजस्थानात 199 पैकी 102 जागांवर आघाडीवर आहे. तेलंगणात काँग्रेस 64 धावांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे, एक्झिट पोलने छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या विजयाचा अंदाज वर्तवला होता. परंतु सध्याच्या ट्रेंडवरून भाजप काँग्रेसपेक्षा किरकोळ पुढे आहे. रिपोर्ट्सनुसार, भाजप 45 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस 44 जागांवर आघाडीवर आहे. राज्यात बहुमताचा आकडा 46 आहे.

दरम्यान, तेलंगणा निवडणुकीतील आणखी एक चर्चेतला चेहरा म्हणजे भारताचा माजी क्रिकेटपटू, माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनही (Mohammad Azharuddin) या निवडणुकीत काँग्रेसतर्फे उतरले आहेत. हैदराबादच्या ज्युबिली हिल्स या मतदारसंघातून ते निवडणूक लढवित आहेत. सकाळी आलेल्या आकडीवारीनुसार त्यांनी या मतदारसंघात आघाडी घेतली असून विजयाच्या दिशेने आगेकूच केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

केसीआरच्या खुर्चीला धक्का बसणार? तेलंगणात काँग्रेसने प्राथमिक कलांमध्ये बहुमताचा 60 जागांचा आकडा गाठला

अरे मी काय लेचापेचा राजकारणी नाही जे काही असेल ते तोंडावर बोलणारा आहे; दादांनी विरोधकांना सुनावले खडेबोल

“अजितदादांच्या नेतृत्वाखालील विचार शिबीर देशाच्या राजकारणात झंझावात उभा केल्याशिवाय राहणार नाही”

म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासाठी अभय योजना सदनिका घेतली त्यावर्षीच्या रेडीरेकनर नुसार स्टॅम्प ड्युटी आकारणार