ईशनिंदा संबंधित सामग्रीचा वाद ;विकिपीडियाविरोधात पाकिस्तान सरकारने उचलले टोकाचे पाऊल

Wikipedia : पाकिस्तान सरकारने (Government of Pakistan) विकिपीडियाला पूर्णपणे काळ्या यादीत टाकले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सरकारने विकिपीडियावरील आक्षेपार्ह निंदनीय सामग्री काढून टाकण्यास नकार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

एका मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तान टेलिकॉम अथॉरिटी (PTA) ने विकिपीडियाची सेवा ४८ तासांसाठी निलंबित केल्यानंतर काही दिवसांनी विकिपीडियाला आता काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. पीटीएच्या प्रवक्त्याने शुक्रवारी रात्री उशिरा विकिपीडिया ब्लॉक करण्याबाबत माहिती शेअर केली आहे.

पाकिस्तान दूरसंचार प्राधिकरणाने (पीटीए) जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अयोग्य मजकूर काढण्यासाठी विकिपीडियाशी संपर्क साधण्यात आला होता. परंतु विकिपीडियाने निंदनीय मजकूर काढला नाही, विकिपीडिया त्यावर चर्चा करण्यासही तयार नाही, असे निवेदनात म्हटले आहे.

पीटीएने म्हटले आहे की, विकिपीडियाने या प्रकरणात जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यामुळे पूर्वीच्या विकिपीडियाच्या सेवा ४८ तासांसाठी ब्लॉक/रिपोर्ट केल्या गेल्या होत्या. यापूर्वी असा वादग्रस्त मजकूर काढून टाकण्याचा आग्रह धरण्यात आला होता पण त्यांनी तसे केले नाही. प्रवक्त्याने सांगितले की जर बेकायदेशीरपणे नोंदवलेला मजकूर ब्लॉक केला/काढला गेला तर, विकिपीडियाच्या सेवा पुनर्संचयित करण्यावर पुनर्विचार केला जाईल. म्हणजेच जर वेबसाइटने असा मजकूर काढून टाकला तर पाकिस्तानमधील लोकांना पुन्हा साइटवर प्रवेश करता येईल.