राम मंदिराचं लोकार्पण होतंय, त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या पोटात गोळा उठला?

BJP Vs Uddhav thackeray: उद्धव ठाकरे आणि हिंदुत्ववाचा काही संबंध उरला आहे का? असा सवाल भाजपने आज उपस्थित करत खोचक टीका केली आहे. राम मंदिराचं (Ram Temple) लोकार्पण होतंय, त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या पोटात गोळा उठला असल्याची देखील टीका केली आहे.

तेलंगणात काँग्रेस (Telangana Congress) जिंकली की लोकशाहीचा विजय आणि इतर राज्यात भाजप जिंकली की इव्हीएमवर शंका उपस्थित केली जाते. उद्धव ठाकरे किती रडारड करणार?असा सवाल करत इव्हीएमवरून भाजपने ठाकरेंना टोला लगावला आहे.

महाराष्ट्र भाजपनं एक्सच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. यात म्हटले आहे की, उद्धव ठाकरे तुमचा आणि हिंदुत्ववाचा आता काही संबंध उरला आहे का? ज्यादिवशी सत्तेसाठी तुम्ही काँग्रेससोबत जाऊन बसला त्याच दिवशी तुम्ही हिंदुत्वाचे विचार गुंडाळून ठेवलेत. राम मंदिर आमच्यासाठी राजकारणाचा मुद्दा नाही तो आमच्या अस्मितेचा मुद्दा आहे.

राम मंदिराच्या मुद्द्यांवर मंदिर वही बनाऐंगे लेकीन तारीख नहीं बताऐंगे अशी टीका तुम्हीच केली होती पण आता २२ जानेवारी रोजी मंदिराचं लोकार्पण होतंय. त्यामुळे तुमच्या पोटात गोळा उठला आहे. कर्नाटक, तेलंगणात काँग्रेस जिंकली की लोकशाहीचा विजय आणि राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेशात भाजप जिंकली की इव्हीएमवर शंका. उद्धव ठाकरे किती रडारड करणार?

महत्वाच्या बातम्या-

‘मुस्लिम मुलाशी लग्न केल्यास हिंदू मुली त्यांचे हक्क गमावतील’, भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान

Cyclone Michaung चा हाहाकार, चेन्नईत पाच जणांचा मृत्यू; एअरफील्ड बंद

अफेअरच्या चर्चांदरम्यान जान्हवी कपूरचं बड्या नेत्याच्या नातवाबरोबर महाकाल दर्शन – Video