सुरेश रैनाप्रमाणे आता चेन्नई सुपर किंग्जमधून आता रवींद्र जडेजाचाही होणार कायमचा पत्ता कट ? 

मुंबई – चेन्नई सुपर किंग्ज (CSK) अष्टपैलू रवींद्र जडेजा(Ravindra jadeja) बुधवारी बरगडीच्या दुखापतीमुळे IPL 2022 मधून बाहेर पडला. फ्रेंचायझीने बुधवारी ही माहिती दिली. दुखापतीबाबत जडेजाच्या बाजूने कोणतेही वक्तव्य आलेले नाही. अशा स्थितीत फ्रँचायझी आणि जडेजा यांच्यात फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टीम इंडियाचा माजी सलामीवीर आकाश चोप्राने(Akash Chopra) मोठा दावा केला आहे. आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर मुंबई इंडियन्स (MI) आणि चेन्नई सुपर किंग्ज (MI) यांच्यातील सामन्याचे पुनरावलोकन करताना सांगितले की, त्याला असे वाटते की जडेजा पुढील वर्षी CSK कडून खेळताना दिसणार नाही. तो म्हणाला, चेन्नईच्या संदर्भात मी सांगू इच्छितो की जडेजा सामना खेळणार नाही आणि मला वाटते की तो पुढील वर्षीही खेळणार नाही.

चोप्राने सुरेश रैनाचे(former csk player suresh raina) उदाहरण दिले आणि सांगितले की फ्रँचायझी अचानक खेळाडूंशी संबंध तोडतात आणि हे यापूर्वीही दिसून आले आहे. “सीएसकेमध्ये असे बरेच घडते की दुखापतीबद्दल स्पष्टता नसते आणि नंतर खेळाडू खेळत नाही. मला आठवते की सुरेश रैना 2021 मध्ये काही काळ खेळला आणि त्यानंतर सर्व काही संपले, टाटा. मला माहित नाही की जडेजाचे काय प्रकरण आहे, परंतु त्याची अनुपस्थिती सीएसकेसाठी समस्या असेल.

डावखुरा अष्टपैलू खेळाडू IPL 2022 मध्ये CSK साठी सर्वात महागडा खेळाडू होता, त्याला 16 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवण्यात आले होते. स्पर्धा सुरू होण्याच्या काही दिवस अगोदर त्याची संघाच्या कर्णधारपदी नियुक्तीही करण्यात आली होती. मात्र त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नईने आठपैकी सहा सामने गमावले. जडेजाचा फॉर्मही खराब होता आणि तो केवळ 111 धावा करू शकला आणि केवळ तीन विकेट्स(only 3 wickets)घेतल्या. त्यानंतर त्याने आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी संघाचे कर्णधारपद(Captancy) सोडले आणि एमएस धोनीला(M S Dhoni) पुन्हा संघाचे नेतृत्व करण्याची विनंती केली.