Bollywood | निर्मात्याला माझ्यासोबत झोपायचं होतं… अभिनेत्रीला १९व्या वर्षी आला होता वाईट अनुभव

टीव्ही जगतातील (Bollywood) आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अकिंता लोखंडे (Akinta Lokhande) बऱ्याच दिवसांपासून लाइमलाइटचा भाग आहे. अंकिता पती विकी जैनसोबत बिग बॉस 17 मध्ये सहभागी झाली होती. जिथे तिने आपल्या नात्याबद्दल अनेक गोष्टी ऐकल्या. पण हा शो संपला आणि बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर तिचे आणि विकीचे नाते पुन्हा चांगले बनले आहे. अंकिता लोखंडेला पवित्र रिश्ता या मालिकेतून घराघरात ओळख मिळाली होती.

टीव्हीसोबतच आता अंकिता लोखंडे चित्रपटांमध्येही दिसणार आहे. अंकितासाठी अभिनयाच्या जगात आपला ठसा उमटवणे इतके सोपे नव्हते. अभिनेत्रीला तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. हॉटरफ्लायला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीदरम्यान अंकिताने खुलासा केला की, ती १९ वर्षांची असताना तिला कास्टिंग काउचचा सामना करावा लागला होता. अंकिताच्या या खुलाशामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

अंकिता लोखंडेने सांगितल्यानुसार, ती केवळ १९ वर्षांची होती आणि त्यादरम्यान तिला अनेक ऑफर्स येत होत्या. तिला अभिनेत्री व्हायचं होतं. साऊथ चित्रपटांसाठी तिने अनेक ऑडिशन्सही दिल्या. त्यादरम्यान तिला फोन आला आणि चित्रपट साइन करण्यासाठी येण्यास सांगण्यात आले. तिला खूप आनंद झाला, म्हणून तिने मी चित्रपट साइन करुन येते असे आईला सांगितले. तिलाही साशंकता होती की, तिला हा चित्रपट इतक्या सहजासहजी कसा काय मिळाला?

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

कास्टिंग काउचचा (Bollywood) अनुभव सांगताना, अभिनेत्री म्हणाली की तिने बुद्धिमत्ता दाखवली आणि मग काय करावे लागेल असे विचारले. तर तो व्यक्ती म्हणाला, ‘तुला निर्मात्यासोबत झोपावे लागेल.’ त्यानंतर अंकिताने त्याला सांगितले की, तुझ्या निर्मात्याला टॅलेंटची गरज आहे असे मला वाटत नाही. त्याला झोपण्यासाठी फक्त एका मुलीची गरज आहे, आणि मी ती मुलगी नाही. असे म्हणून अंकिता तिथून निघून गेल्याचे तिने सांगितले.

महत्वाच्या बातम्या : 

विधिमंडळाच्या लॉबीत सत्ताधारी आमदारांची धक्काबुक्की महाराष्ट्राला लाज आणणारी: Nana Patole

Sambhaji Bhide: संभाजी भिडेंच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न, काळे झेंडेही दाखवले

Muralidhar Mohol | मोहोळांनीही उघडले लोकसभेचे पत्ते; म्हणाले, ‘मी लोकसभेची तयारी करतोय, पण…’