Hardik Pandya | हार्दिक पांड्याला कर्णधार बनवल्याने बुमराह आणि सूर्यकुमार खूश नाहीत? हर्षा भोगलेंनी सांगितले कारण

Hardik Pandya | आयपीएल 2024 पूर्वी हार्दिक पांड्याकडे मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सोपवण्यात आले. तेव्हाापासून सोशल मीडियावर चाहते सातत्याने नाराजी व्यक्त करत आहेत. सोशल मीडियाशिवाय हार्दिक पांड्याला स्टेडियममधील चाहत्यांच्या रोषालाही सामोरे जावे लागले आहे. मुंबई इंडियन्सच्या सामन्यादरम्यान चाहत्यांनी हार्दिकला अनेकदा शिवीगाळ केली. पण आता असे दिसते आहे की कदाचित संघातील काही खेळाडू हार्दिकला कर्णधार बनवल्याने खूश नाहीत. अनेक क्रिकेटपटूंनीही या मुद्द्यावर आपले मत मांडले आहे. आता प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनीही हार्दिकबद्दल आपलं मत मांडलं आहे.

हार्दिकच्या कर्णधारपदावर बुमराह आणि सूर्या नाराज!
आयपीएल 2024 च्या लिलावापूर्वी, मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सच्या ट्रेडद्वारे हार्दिक पांड्याचा त्यांच्या संघात समावेश केला होता. मात्र मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाने अचानक हार्दिकला (Hardik Pandya) संघाचा नवा कर्णधार बनवण्याची घोषणा केल्याने आश्चर्याचा धक्का बसला. यामुळे चाहते संतापले आणि त्यांनी हार्दिकला ट्रोल करण्यास सुरुवात केली. अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सला अनफॉलो केले. आता या प्रकरणावर हर्षा भोगलेने त्याच्या यूट्यूब चॅनलवर दावा केला आहे की, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह सारखे खेळाडूही या निर्णयावर खूश नाहीत. कारण रोहितनंतर बुमराह आणि सूर्या हे या संघातील सर्वात वरिष्ठ खेळाडू आहेत. याशिवाय सूर्याने यापूर्वी मुंबईचे कर्णधारपदही भूषवले आहे. तर बुमराह भारतीय संघाचा उपकर्णधार आहे. त्याने कसोटीत भारताचे नेतृत्वही केले आहे.

हर्षा भोगले पुढे म्हणाले की, गौतम गंभीरने सूर्याची क्षमता ओळखून त्याला कोलकाता नाईट रायडर्सचा उपकर्णधार बनवले होते. सूर्या असा विचार करत असेल की रोहित नाही तर मी का नाही? बुमराह देखील असाच काहीसा विचार करत असेल. कारण त्याने कसोटी संघाचे कर्णधारपद भूषवले आहे, तो एक हुशार गोलंदाज आहे, खेळ चांगला वाचतो आणि तो सध्या भारतीय संघातील सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे. या सर्व गोष्टी पाहता हे दोन्ही खेळाडू हार्दिकच्या कर्णधारपदावर नाराज असल्याचे दिसून येत आहे.

हर्षा भोगले यांचा मुंबई इंडियन्सला सल्ला
भोगले यांनी मुंबई इंडियन्सला सल्ला दिला की, या नाटकाशी संबंधित कोणीही सोशल मीडियावर काय बोलले जात आहे याकडे लक्ष देऊ नये. हे करणे सोपे नसले तरी मी प्रत्येक युवा खेळाडूला हे सांगतो. मी हे चाहत्यांच्या दृष्टीकोनातून म्हणत आहे कारण चाहते हे या खेळाचा आत्मा आणि हृदय आहेत. या सर्व परिस्थितीतही सर्व खेळाडूंनी आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narayan Rane | पुण्याची खासदारांची विशेष परंपरा मुरलीधर मोहोळ जोपासणार

Uddhav Thackeray | मुंबईतल्या २ जागा मित्रपक्षाला दिल्यात, ते लढणार नसतील तर आम्ही लढू

Vasant More | “२५ वर्ष ज्या पक्षात एकनिष्ठ राहिलो, तिथे न्याय मिळाला नाही”; वसंत मोरेंनी बोलून दाखवली खंत