दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयचा छापा

New Delhi – सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या घरासह 21 ठिकाणी छापे टाकले आहेत. एक्साईज पॉलिसीमधील अनियमिततेमुळे ही छापेमारी करण्यात आली आहे. सिसोदिया यांच्या घराशिवाय दिल्ली-एनसीआरमधील 20 ठिकाणीही सीबीआयने छापेमारी सुरू केली आहे.

एक्साईज पॉलिसीत (excise policy case) अनियमितात झाल्याने उपराज्यपाल व्हि.के, सक्सेना यांनी सीबीआय चौकशीची शिफारस केली होती. त्यामुळे सीबीआयने हे धाडसत्र सुरू केलं आहे. सीबीआय चौकशीला आम्ही पूर्ण सहकार्य करू. या चौकशीतून लवकरच सत्य बाहेर येईल. माझ्यावर अनेक खटले दाखल केले आहेत. मात्र, त्यांच्या हाती काही लागले नाही. यातही काही निघणार नाही, असं मनिष सिसोदिया यांनी म्हटलं आहे.

नवीन उत्पादन शुल्क धोरण गेल्या वर्षी दिल्लीत लागू करण्यात आले. त्यानुसार दिल्लीची 32 झोनमध्ये विभागणी करण्यात आली. त्यापैकी 849 परवान्यांचे वाटप करण्यात आले. या 32 झोनमध्ये प्रत्येक झोनमध्ये सरासरी 26 ते 27 दारूची दुकाने सुरू होती. आतापर्यंत दिल्लीत 60 टक्के दुकाने सरकारी आणि 40 टक्के खाजगी हातात होती पण या धोरणानंतर 100 टक्के दुकाने खाजगी हातात गेली आहेत. इथून केजरीवाल सरकारने दारूची दुकाने खाजगी हातात देऊन भ्रष्टाचार केला असा वाद सुरू आहे.