Chandrakant Patil | …अन् काँग्रेसचा पुण्याचा उमेदवार चंद्रकांत पाटलांनी जाहीर केला, वाचा नेमकं काय घडलं?

Chandrakant Patil | लोकसभा निवडणुका (LokSabha Elections 2024) जाहीर होताच राज्यातील सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. त्यात पश्चिम मागराष्ट्रात महत्वाच्या असणाऱ्या पुणे लोकसभेच्या जागेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतर्फे जोरदार प्रचारास सुरवात झाली आहे. यात भाजपने आघाडी घेतली असून भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांना महायुतीची अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. यासंदर्भातच आज पुण्यात महायुतीच्या सर्व घटक पक्षांची समन्वय बैठक चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांच्या उपस्थितीत पार पाडली.

मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्या विजयासाठी महायुती एकत्रितपणे लढणार असून पुण्याची जागा आम्ही गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक मताधिक्याने जिंकू असा विश्वास या बैठकीदरम्यान चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. काय करावे आणि काय न करावे अशा सूचना आज पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. गिरीश बापट यांना ६ लाख ३१ हजार मत होती आणि यात उद्धव सेना असं म्हणण्यापेक्षा त्यांना शिल्लक सेना म्हणावं लागेल यांची किती कमी होतील आणि अजित पवार आल्यामुळे किती वाढतील या संदर्भात चर्चा झाली. विरोधकांनी भंपक पर्सेंप्शन तयार केलं त्यामुळे विचार करून उमेदवार उभं करा. असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

का बैठकीपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांना पुणे लोकसभा निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे. मनसे सोडलेले नेते वसंत मोरे हे अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. याचा फटका भाजपला बसू शकतो का? असा प्रश्न विचारला असता चंद्रकांत पाटील म्हणाले, वसंत मोरे हे अपक्ष लढले तरी भाजपला त्याचा फटका बसणार नाही. कारण भाजपची मूळची मत आहे ती भाजपकडेच राहणार आहे. मागील वेळी मिळालेल्या 6 लाख 31 हजार मताधिक्य भाजपचं कायम राहणार आहे. त्यामुळे मोरे जर अपक्ष उभे राहिले तर भाजपची मते खाणार नाही. तर समोरच्यांची म्हणजेच मोहन जोशींची मते खातील असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.

त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर होण्याआधीच भाजपची लढत काँग्रेसच्या मोहन जोशी (Mohan Joshi) यांच्यासोबत असल्याचचं एकप्रकारे चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलं की काय याची चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Ajit Pawar | घर फुटलं खूप वाईट वाटतंय, श्रीनिवास पवार यांच्यानंतर बड्या नेत्याचा अजित पवारांना टोला

Shrinivas Pawar | पवार नाव संपवण्यासाठी भाजपाने ही चाल खेळली, श्रीनिवास पवार यांनी भाजपावर केली खोचक टीका

Chandrasekhar Bawankule | उद्धव ठाकरेंना आता तमाम हिंदू बांधवांनो म्हणायलाही लाज वाटते, बावनकुळे यांची टीका