…म्हणून पत्रकारांच्या बाबत मी तसे बोललो होतो आणि त्यात गैर काही नाही – बावनकुळे 

Chandrashekhar Bawankule On Journalists: भाजपाचे कार्यकर्ते बुथ स्तरावर चांगले काम करीत आहेत. त्यांच्या कामाची प्रसिद्धी व्हावी यासाठी प्रयत्न करायलाच हवा. अनेकदा असे होते की घटना घडलीच नाही.  अपूर्ण माहितीवर बातमी येते. बातम्या देण्याचा अधिकार पत्रकारांचा आहेच, मात्र चुकीच्या बातम्या येऊ नये, याची काळजी घेण्यासाठी आपण पत्रकारांशी चांगले संबंध ठेवले पाहिजे या संदर्भाने मी बोललो होतो आणि त्यात गैर काही नाही, असे मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आहे, कोणत्याही गोष्टीचा निगेटिव अर्थ काढणे, चुकीचेच असल्याचे ते म्हणाले,

ते नाशिक येथे पत्रकारांशी बोलत होते,  ते म्हणाले, नागपूरमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin Gadkari) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पाहणी केली. फडणवीस यांनी केलेल्या पाहणीच्या व्हिडीओचा विपर्यास करण्यात आला आहे,. माध्यमातून बातम्या चालवण्यासाठी काही लोक चुकीचं नॅरेटिव्ह सेट करण्याचे काम करतात.  नागपूरमध्ये अतिवृष्टीनंतर माझ्यासह सर्व भाजपा कार्यकर्ते फिल्डवर होते. सायंकाळी गडकरी आणि फडणवीस यांनी आढावा घेतला, तर फडणवीस यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यांच्या दौऱ्यात एका घराची त्यांनी तब्बल पंधरा मिनिटे तपासणी केली. दोन्ही नेत्यांनी केलेल्या विकासकामांमुळे मागील दहा वर्षांत नागपूर बदलले आहे. त्यामुळे जनतेच्या मनात दोन्ही नेत्याबद्दल आदर आहे. ज्यांनी विकासासाठी एकही रुपया खर्च केला नाही, त्यांनी चुकीची व निगेटिव्ह माहिती पसरवू नये.

महत्त्वाच्या बातम्या-
शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा

अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ नियोजित वेळेतच सायंकाळी विसर्जन मिरवणुकीत होणार सहभागी

भाईजानचा थाटच न्यारा! गळ्यात भगवं उपरणं टाकून पोहचला CM शिंदेंच्या घरी गणरायाच्या दर्शनाला