Kapil Dev kidnap : तोंडावर कापड… हात बांधलेले… कपिल देव यांना कोणी केलं किडनॅप?

Kapil Dev Kidnapped: भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने (Gautam Gambhir) ट्वीटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये विश्वविजेता कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांचे हात पाठीमागे दोरीने बांधलेले आहेत, तर काही लोक त्यांना धक्काबुक्की करत आहेत. चेहऱ्यावर मलमपट्टी केली आहे. व्हिडिओमध्ये 1983 चा विश्वचषक विजेता कर्णधार कपिल पूर्णपणे असहाय्य दिसत आहे.

माजी भारतीय खेळाडू असहाय्य नजरेने पाहत असताना दोन पुरुष त्याला धरून एका खोलीकडे घेऊन जात असल्याचे क्लिपमध्ये दिसते. गंभीरने व्हिडिओ शेअर करत गंभीर प्रश्न विचारला की वर्ल्ड कप विजेत्या कर्णधाराचे अपहरण झाले आहे का? गंभीरने त्याच्या ट्वीटरच्या प्रोफाईलवर पोस्ट केली आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर क्रिकेट चाहत्यांना कपिल देव यांचे अपहरण तर झाले नाही ना याची चिंता सतावू लागली आहे.

मात्र, अद्याप या व्हिडिओला काहीही दुजोरा मिळालेला नाही. दुसरीकडे, चाहत्यांनी टिप्पणी केली की हा व्हिडिओ जाहिरातीसाठी शूट केला जात असावा. एवढेच नाही तर जाहिरातीसाठी असा व्हिडिओ शूट केल्याने चाहत्यांनी त्यांच्यावर टीकाही केली आहे.

उल्लेखनीय आहे की याआधी माजी कर्णधार सौरव गांगुली, बॉलिवूड अभिनेत्री काजोलसह अनेक सेलिब्रिटींनी जाहिरातींसाठी असे डावपेच अवलंबले आहेत. आधी व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि नंतर ते बनावट असल्याचे उघड झाले आहे. आता या व्हिडिओमागचे सत्यही लवकरच पुढे येईल.

महत्त्वाच्या बातम्या-
शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा

अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ नियोजित वेळेतच सायंकाळी विसर्जन मिरवणुकीत होणार सहभागी

भाईजानचा थाटच न्यारा! गळ्यात भगवं उपरणं टाकून पोहचला CM शिंदेंच्या घरी गणरायाच्या दर्शनाला