छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं ब्रिटनमधून परत आणणार; सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

मुंबई:  सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार राज्य सरकार छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं ब्रिटनमधून परत आणण्याचा प्रयत्न करणार आहे. या आधी शिवरायांची जगदंबा तलवार परत आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले होते.

शिवाजी महाराजांनी अफजलखानाला मारण्यासाठी वापरलेल्या वाघनखांबाबत नेहमीच चर्चा असते. ही वाघनखं इंग्लंडच्या वास्तुसंग्रहालयात आहेत. ही वाघनखं पुन्हा भारतात आणण्यासाठी आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे पाठपुरावा करत आहोत. पुढील वर्षी होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी ही वाघनखं पुन्हा भारतात आणण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.