युक्रेनवरील संघर्ष टळला; मात्र अजूनही रशियन सैनिक सीमेवर असल्याचा अमेरिकेचा दावा

नवी दिल्ली : रशियाचा युक्रेनवरील हल्ला आता टळला आहे. क्रिमियातील लष्करी सराव संपला असल्याची माहिती रशियाकडून देण्यात आली आहे. रशियाने २०१४ मध्ये युक्रेनकडून क्रिमियाला ताब्यात घेतले होते. एक दिवस अगोदरच रशियाने युक्रेनच्या सीमेवर तैनात असलेली लष्करी तुकडीला मागे हटवत असल्याची घोषणा केली आहे. यासंदर्भात एएफपी या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे की, रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दक्षिणेकडील लष्करी तळाच्या युनिट्सनी त्यांचे लष्करी सराव पूर्ण केला आहे आणि आता ते त्यांच्या कायमस्वरूपी तळावर परतत आहेत.

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी रशियाने सैनिक माघारी घेतले नसल्याचा दावा केला आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की, रशियाने खरचं सैन्य माघारी घेतले आहे की नाही यासंदर्भात त्यांनी कोणताही पुरावा सादर केला नाही. युक्रेनच्या सीमेवर 1.5 लाखांहून अधिक रशियन सैन्य तैनात करण्यात आले होते, ज्यामुळे अमेरिका आणि पाश्चात्य देशांची चिंता वाढली होती.

युरोपातील वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन फिल्ड दौऱ्यावर निघाले असताना रशियाकडून ही माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बिडेन म्हणाले की, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा असा कोणताही महत्वाचा निर्णय आपल्यासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. त्यांनी मॉस्को देशालाही कडक शब्दात इशारा दिला आहे.

रशियन युक्रेनवरील समस्यांवर अमेरिका राजनैतिक पद्धतीने अजूनही काही देशांसोबत वाटाघाटी करायला तयार आहे. तसेच युक्रेनच्या सीमेवर अद्यापही १५०,००० हुन अधिक रशियन सैनिक त्याठिकाणी तैनात असल्याचं लॉयड ऑस्टिन फिल्ड यांनी सांगितले आहे.