Loksabha Elections: १-२ नव्हे तब्बल १२ आमदार नाराज; कॉंग्रेसला खिंडार पडण्याची शक्यता

Congress: लोकसभा निवडणूक (Loksabha Election 2024) जसजशी जवळ येत आहेत तशी कॉंग्रेसमधून गळती सुरु झाली आहे. महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मध्य प्रदेशात माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamalnath) भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु असताना आता झारखंडच्या राजकारणात पुन्हा वादळ घोंघावत असल्याची माहिती मिळत आहे.

झारखंड सरकारमध्ये मंत्रीपद न मिळाल्याने काँग्रेसच्या काही आमदारांमध्ये प्रचंड नाराजी असल्याची माहिती मिळत आहे. या नाराज आमदारांची संख्या 12 आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आलमगीर आलम, रामेश्वर उराँव, बन्ना गुप्ता आणि बादल पत्रलेख यांना पुन्हा मंत्रीपद देण्यात आल्याने काँग्रेस आमदारांचा एक मोठा गट नाराज असल्याची माहिती मिळत आहे.

काँग्रेसच्या 12 आमदारांनी मागणी केली आहे की, मंत्रिमंडळात सहभागी झालेल्या काही मंत्र्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात यावी. तसं न केल्यास 23 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या आगामी विधानसभेच्या अधिवेशनावर बहिष्कार टाकणार आणि जयपूरला जाणार, असा इशारा काँग्रेसच्या आमदारांनी दिल्याची माहिती समोर आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

ऐतिहासिक! रोहितच्या नेतृत्त्वाखाली भारताचा इंग्लंडवर सर्वात मोठा विजय, ४३४ धावांनी जिंकली कसोटी

Sunetra Pawar | सुप्रिया सुळे यांच्यासमोर आव्हान निर्माण करणाऱ्या सुनेत्रा पवार नेमक्या कोण आहेत?

Ambernath | धक्कादायक ! चोरीच्या संशयातून दोन तरुणांना जमावानं बेदम मारहाण करून संपवलं