Chandrashekhar Bawankule | ते तर… ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’; चंद्रशेखर बावनकुळे यांचा ठाकरेंना टोला

Chandrashekhar Bawankule | महायुतीमध्ये असणारे शिवसेनेचे आमदार परत उद्धव ठाकरेंकडे (Uddhav Thackeray) जाणार नाहीत. विशेष म्हणजे, असा विचार करणेही ” मुंगेरीलाल के हसीन सपने ” म्हटले पाहिजे, असा टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी लगावला.

नागपूर येथे ते माध्यमांशी संवाद साधत होते. बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे व त्यांच्या सोबत असणाऱ्या लोकांना आजही दिवास्वप्न पडते, याचेच आश्चर्य आहे मुख्यमंत्री एकनाथ शिदे उत्कृष्ठपणे सरकार चालवत आहेत. एवढ्या चांगल्या सरकारमधील आमदारांना परत जाण्याची शक्यता नाहीच.

भाजपाने २० जागा जाहीर केल्या आहेत. उमेदवारांचा प्रचाराबाबत चर्चा करण्यासाठी बैठक होणार आहे. ५१ टक्के मते कशी मिळतील यासाठी नियोजन करणार आहोत. ज्या जागांवर एकमत झाले आहे, त्या जागा घोषित करण्याची सहकारी पक्षांना मुभा आहे. महायुतीचे तिन्ही नेते एकत्र येतील व लवकरच उर्वरित जागांवर एकमत होईल. भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जागा भाजपाच्याच आहेत त्यावर भाजप-महायुती एकत्र लढणार, असेही ते म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Ajit Pawar | निलेशला मीच पक्षात आणलं, त्याला प्रचंड निधीही दिला, पण…. अजित पवारांनी मनातली खदखद बोलून दाखवली

Ajit Pawar | पक्षातून वेगळे झालात, मग शरद पवारांचे फोटो कशाला वापरता? सुप्रीम कोर्टाने अजित पवारांना फटकारले

Nitin Gadkari | नागपूर शहरात २४ तास पाणी पुरवठ्याचे स्वप्न पूर्णत्वाकडे