‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी अलोट गर्दी

तालसम्राट पद्मश्री शिवमणी, विचारवंत,साहित्यिक आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज डॉ. सदानंद मोरे, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष मा.जयंत पाटील, भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ, आ. रविंद्र धंगेकर ,मोहन दादा जोशी यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या बाप्पांचे दर्शन

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब गणपती ट्रस्टच्या बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी रविवारी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. सांयकाळच्या सुमारास तर अक्षरशः भाविकांचा पूरच आला होता. तालसम्राट पद्मश्री शिवमणीजी, ज्येष्ठ विचारवंत,साहित्यिकांनी संत तुकाराम महाराजांचे वंशज डॉ.सदानंद मोरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मा.जयंत पाटील, भाजपच्याप्रवक्त्या मा .चित्रा वाघ, आमदार रविंद्र धंगेकर, काँग्रेसचे नेते मोहन जोशी, राज्य शासनाच्या गृह विभागाचे सह सचिव कैलास गायकवाड, पुणे ग्रामीणचे अप्पर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, अभिनेत्री कायनात अरोरा, अभिनेता शिव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी दर्शन घेतले. ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीतदादा बालन यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.

रविवारी सकाळी सीमेवर लढताना अपंगत्व आलेल्या भारत मातेच्या सुपुत्रांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली. त्यानंतर अध्यक्ष संजीव जावळे यांनी भारत मातेच्या सुपुत्रांना गौरविले. दुपारी भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्रस्टला भेट देवून श्रींची आरती केली. काही वेळानंतर राष्ट्रवादीचे जयंत पाटील हे बाप्पांच्या दर्शनासाठी आले. त्यांनी आरती केली. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास तालसम्राट पद्मश्री शिवमणी यांच्याहस्ते वाद्यपूजन करण्यात आले. वंदेमातरम् संघटना कृत युवा वाद्य पथक, रूद्रांग वाद्य पथक, कलावंत वाद्य पथक, अभेद्य वाद्य पथक, शिवसाम्राज्य वाद्य पथक आणि शिववर्धन वाद्य पथक यांनी यावेळी एकत्रित वाद्यपूजन केले.

दरम्यान, काँग्रेसचे कसबा मतदार संघाचे आमदार रविंद्र धंगेकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी हे बाप्पांच्या दर्शनासाठी दाखल झाले. त्यांनी श्रींचे दर्शन घेतले. पुनीतदादा बालन यांनी त्यांचा सन्मान केला.

रात्री आठ वाजता महाआरतीस सुरूवात झाली. ज्येष्ठ विचारवंत सदानंद मोरे, राज्य गृह विभागाचे सह सचिव कैलास गायकवाड, पुणे ग्रामीणचे अप्पर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली. यावेळी अभिनेत्री कायनात अरोरा आणि अभिनेता शिव ठाकरे यांनी देखील बाप्पांचे दर्शन घेतले.

रविवार सुट्टीचा दिवस असल्याने सकाळीपासुन श्रींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी झुंबड उडाली होती. सायंकाळी तर प्रचंड गर्दी झाली होती. महाआरतीला तर भाविकांचा पूरच लोटला होता. रात्री उशिरापर्यंत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी मोठी रांग लागली होती. रात्रीच्या वेळेस देखील अनेक मान्यवरांनी बाप्पांचे दर्शन घेतले.

महत्वाच्या बातम्या-

मुंबई महापालिकेचे भूखंड व उद्याने दत्तक देण्याचे धोरण रद्द करा; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मागणी

वंचित बहुजन आघाडीचा Gautam Adani – Sharad Pawar भेटीवरून कॉंग्रेसला टोला !

ससूनमधील रुग्णांना ‘Virtual Reality’द्वारे ‘दगडूशेठ’ बाप्पाचे दर्शन