धक्कादायक! गणपती मंडपात नाचता नाचता तरूणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Man Died Of Heart Attack In Ganesh Festival: महाराष्ट्रात सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची (Ganeshutsav) धामधूम सुरू आहे. पुणे, मुंबई, कोकणसह सर्वत्र गणेश मंडळांसमोर तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र गणेशोत्सवाला गालबोट लावणारी बातमी समोर येत आहे. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून गणपतीच्या कार्यक्रमात नाचता नाचता तरूणाचा मृत्यू झाला आहे.

ही घटना आंध्रप्रदेश येथील असल्याची माहिती समोर आली असून हा तरूण २६ वर्षांचा असल्याचं बोललं जातंय. अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. कोरोना काळानंतर अनेक तरूणांचे अशा प्रकारे जीव गेले असल्याचंही मत नेटकऱ्यांनी व्यक्त केलंय. “कोण कधी जाईल ते सांगता येत नाही त्यामुळे काळजी घ्या आणि सर्वांशी प्रेमाने वागा” अशा कमेंट नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

मुंबई महापालिकेचे भूखंड व उद्याने दत्तक देण्याचे धोरण रद्द करा; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मागणी

वंचित बहुजन आघाडीचा Gautam Adani – Sharad Pawar भेटीवरून कॉंग्रेसला टोला !

ससूनमधील रुग्णांना ‘Virtual Reality’द्वारे ‘दगडूशेठ’ बाप्पाचे दर्शन