Shivam Dube | ‘शिवम दुबेला टी20 वर्ल्डकपमध्ये स्थान मिळाले नाही तर सीएसके जबाबदार असेल’, माजी दिग्गजाचा निशाणा

Shivam Dube | चेन्नई सुपर किंग्जचा स्फोटक फलंदाज शिवम दुबे चर्चेत आहे. अनेक माजी क्रिकेटपटू दुबेला 2024च्या टी-20 विश्वचषकात खेळवण्याची मागणी करत आहेत. दरम्यान, माजी दिग्गज मनोज तिवारी यांनी आश्चर्यकारक विधान केले आहे. शिवम दुबेला टी20 विश्वचषकाच्या संघात स्थान न मिळाल्यास त्याची आयपीएल टीम चेन्नई सुपर किंग्स याला जबाबदार असेल, असे तिवारीचे म्हणणे आहे.

मनोज तिवारीने हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवरही प्रश्न उपस्थित केला. त्याने स्पष्टपणे सांगितले की, हार्दिक पांड्याला टी-20 विश्वचषक संघात सामील व्हायचे असेल तर त्याला गोलंदाजीतही स्वत:ला सिद्ध करावे लागेल. हार्दिकने मागील तीन सामन्यांमध्ये फक्त एकच षटक टाकले आहे.

गोलंदाजीत पांड्या चांगलाच महागडा ठरत आहे.
क्रिकबझवर बोलताना मनोज तिवारी म्हणाला, “जर हार्दिक पांड्याला 2024 च्या टी-20 विश्वचषकात खेळायचे असेल तर त्याला अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावावी लागेल. तुम्ही पहा, तो खूप महागडा ठरत आहे. त्याचा इकॉनॉमी रेट 11 च्या आसपास आहे. तो या मोसमात चांगली कामगिरी करत नाहीये.”

मनोज तिवारी यांनी शिवम दुबेला (Shivam Dube) गोलंदाजी न देण्यावरही प्रश्न उपस्थित केला. जर शिवम दुबेला टी-20 विश्वचषकाच्या संघात स्थान दिले नाही, तर त्याला चेन्नई सुपर किंग्ज जबाबदार असेल, असे तो म्हणाला. तो म्हणाला, “हार्दिकचा फॉर्म पाहता त्याची टी-20 विश्वचषक संघात निवड होणार नाही. आगरकर हे एक मजबूत व्यक्तिमत्त्व आहे आणि त्यामुळेच तो असे धाडसी निर्णय घेऊ शकतो. जर शिवम दुबेची टी-20 वर्ल्डकपसाठी निवड झाली नाही तर त्याला चेन्नई जबाबदार असेल कारण मी खूप दिवसांपासून म्हणत आलो आहे की त्यांनी हार्दिकच्या जागी शिवमला तयार करावे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | यशाचे ‘शिखर’ गाठण्यासाठी निसर्गप्रेमींची साथ उर्जा देणारी

Sunetra Pawar: शरद पवारांनी ‘बाहेरचे पवार’ असा उल्लेख केल्याने सुनेत्राताईंना अश्रू अनावर, म्हणाल्या….

Sunil Tatkare | २०१९ पेक्षा जास्त मतदान या निवडणुकीत माझ्या अल्पसंख्याक समाजाकडून मिळेल