Eknath Shinde | सलमान खान गोळीबार प्रकरणी CM शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले, कायदा हातात घेणाऱ्या व्यक्तीला सोडलं जाणार नाही

Eknath Shinde | बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर चार राऊंड गोळीबार करण्यात आला आहे. पहाटे 4.50 च्या सुमारास दोन अज्ञातांनी हा हवाई गोळीबार केला. दोन्ही शूटर दुचाकीवरून आले आणि चार राऊंड गोळीबार करून तेथून पळ काढला. सध्या तरी कोणी जखमी झाल्याची माहिती नाही. पोलिसांनी सलमान खानच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवली आहे. या घटनेमुळे मुंबई हादरली आहे.

दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सलमान खानशी फोनवरुन संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांशी चर्चा करून सलमान खानची सुरक्षा वाढवण्याची सूचना केली. घटनेप्रकरणी आरोपींना तात्काळ पकडण्यात येणार आहे. त्याबाबतच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्यात. ऐन निवडणुकीच्या काळात कुणी कायदा आणि सुव्यवस्था हाती घेण्याचा प्रयत्न केला तर गप्प बसणार नाही, असा इशारा शिंदेंनी दिला आहे.

माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईकरांना देखील आवाहन केले आहे. हवेत गोळीबार करून पळालेल्या आरोपींना लवकरच पकडले जाईल. मुंबईकरांनी घाबरण्याचे कारण नाही. मुंबई सुरक्षित ठेवण्याचं काम गृहविभाग आणि पोलीस प्रशासन करत आहे. तशा प्रकारच्या सूचना आम्ही पोलिसांना दिल्या असून पोलीस आणखी अॅक्टीव्ह मोडमध्ये काम करत आहेत, असं ते म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | यशाचे ‘शिखर’ गाठण्यासाठी निसर्गप्रेमींची साथ उर्जा देणारी

Sunetra Pawar: शरद पवारांनी ‘बाहेरचे पवार’ असा उल्लेख केल्याने सुनेत्राताईंना अश्रू अनावर, म्हणाल्या….

Sunil Tatkare | २०१९ पेक्षा जास्त मतदान या निवडणुकीत माझ्या अल्पसंख्याक समाजाकडून मिळेल