Gautami Patil: गौतमी पाटील स्टार बनली; पण बाप मात्र बेवारस म्हणून रुग्णालयात दाखल

Gautami Patil’s Father: महाराष्ट्राची प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) हिचे नुकतेच नवीन गाणे रिलीज झाले आहे. माझा कारभार सोप्पा नसतोय रं, या गौतमी पाटीलच्या नव्या गाण्याचे पुन्हा एकदा प्रेक्षकांना वेड लावले आहे. एकीकडे स्टार गौतमीच्या गाण्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे धुळ्यात तिचे वडील बेवारस सापडले आहेत. स्वराज्य फौंडेशन या एनजीओचे प्रमुख दुर्गेश चव्हाण यांना ते खंगलेल्या अवस्थेत सापडले. ज्यानंतर दुर्गेश चव्हाण यांनी त्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

स्वराज्य फौंडेशनचे दुर्गेश चव्हाण हे त्यांच्या एनजीओच्या माध्यमातून बेवारस व्यक्तींना आधार देण्याचे काम करतात. याच माध्यमातून त्यांनी काल सायंकाळी सुरत बायपास हायवे येथून त्यांनी गौतमी पाटील हिच्या वडिलांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मात्र सुरुवातीला ते गौतमीचे वडील आहेत याची खात्री दुर्गेश चव्हाण यांना नव्हती. त्यांच्या खिशातील आधारकार्डच्या आधारे त्या व्यक्तीचे नाव रविंद्र बाबुराव पाटील (Ravindra Patil) रा. वेळोदे ता. चोपडा असल्याचे कळले. व्यक्तीशी संबंधीतांनी संपर्क साधावा यासाठी चव्हाण यांनी सोशल मिडियावर मॅसेज व्हायरल केले.

या व्हायरल मैसेजनंतर रविंद्र पाटील यांच्या भावजाई शोभा आनंद नेरपगार ( पाटील ) या त्यांच्या मुलीसह हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात पोहचल्या. जिथे त्यांनी दुर्गेश चव्हान यांना ते व्यक्ती गौतमीचे वडील असल्याची माहिती दिली.

येथे वाचा आणखी बातम्या-

“मासिक पाळीबद्दल वडिलांना आधी सांगितलं”, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं वक्तव्य

Maratha Reservation : आंदोलनाच्या वेळी झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी – शिंदे

मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज; शरद पवारांनी सांगितलं याला नेमकं कोण आहे जबाबदार

Jalna Lathicharge Case : राज ठाकरेंनी सरकारला झाप झाप झापलं; मराठा समाजाला केले ‘हे’ आवाहन