शेअर मार्केटचे तोटे तर अनेकांनी सांगितले आता वाचा हे फायदे

शेअर मार्केट म्हणजे पैसे बुडाले असं म्हटलं जातं. अनेकांनी शेअर मार्केटचे किती तोटे आहेत. हे सांगितले आहेत पण फायदे फार कमी लोक सांगतात. सध्या आपण अशाआर्थिक युगामध्ये राहत आहोत , जिथे कॉलेजची मुलं देखील पॉकेटमनी वाचवून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करीत आहोत. शेअर मार्केटला नावं ठेवण्याअगोदर या खास बाबी जरूर वाचा.

जेव्हा तुम्ही गुंतवणूक करता तेव्हा तुम्हाला निर्धारित व्याज मिळते, पण ते व्याज आपल्याला समाधानकारक वाटत नाही.अनेकजण ते कमी आहेत अशी तक्रार करतात. आपल्या कष्टाच्या पैशाला योग्य मोबदला मिळत नाही असे ज्यांना वाटते त्यांनी बँकेत किंवा पोस्टात गुंतवणूक करूच नये.तुम्हाला अधिक काही हवे असेल तर तुम्ही शेअरचा विचार करू शकता.शेअर मार्केटमध्ये रोज दर बदलत असतात.तिथे ठरलेले दर नसतात. त्यामुळे तुम्हाला रोज नफा मिळवण्याची संधी आहे. पण त्यासाठी खूप सतर्क असणे गरजेचे आहे. जर तुम्ही शेअर बाजाराचा योग्य अभ्यास केला तर नफा मिळवणे इतके अवघड नाही.

अनेकदा आपण बँकेत किंवा पोस्टात पैसे गुंतवणूक करतो. तेव्हा आपल्याला बँकेत किंवा पोस्टात जावे लागते. तासन-तास रांगेत थांबावे लागते. शेअर मार्केटमध्ये मात्र तसं नाही. जगाच्या पाठीवर कोठेही बसून तुम्ही पैसे गुंतवणूक करू शकता. सध्या शेअर मार्केटचा जर तुम्ही अभ्यास केला तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येऊ शकते, ती म्हणजे शेअर मार्केट सध्या नफ्यात आहे. असे अनेक शेअर आहेत ज्यांच्या किंमती अगदी दुप्पट झाल्या आहेत. शेअरच्या वाढणाऱ्या किंमती पाहून तुम्हाला देखील त्यामध्ये पैसे गुंतवू वाटतील. त्यामुळे फार कमी वेळा असे होते, जेव्हा तुम्हाला तोटा होऊ शकतो. शेअर बाजारात तुम्ही अगदी कमीत- कमी गुंतवणूक करू शकता.

तुम्ही तुमचे महिन्याचे खर्च भागवून अगदी कमी पैशांत पैसे गुंतवणूक करू शकता. कारण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करण्याचा आणखी एक फायदा म्हणजे तुम्हाला जेव्हा हवे तेव्हा तुम्ही पैसे काढू शकता. तुम्हाला कोणाची वाट पाहण्याची गरज नाही किंवा परवानगी घेण्याची देखील गरज नाही. मनात आले पैसे आणि गरज असेल तेव्हा तुम्ही पैसे काढू शकता. शेअर बाजारात गुंतवणूक करताना तुम्ही तुमचे स्वताचे मालक असता, ना तुम्हाला कोणी बॉस असतं ना कोणी , तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही तुमची गुंतवणूक पडताळू शकता.शेअर बाजारात सुरुवातीला मोठी गुंतवणूक न करता अगदी मोजकी गुंतवणूक करावी. एकदा का तुम्हाला त्यांचा अंदाज आला की तुम्ही भरपूर पैसे गुंतवू शकता.