तिहार तुरुंगात उपोषणाला बसलेला फुटीरतावादी नेता यासिन मलिक, करत आहे ही मागणी 

नवी दिल्ली – दिल्लीतील तिहार तुरुंगात (Tihar Jail) बंद असलेला जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट प्रमुख यासिन मलिक (Yasin Malik) तुरुंगातच उपोषणाला (Hunger Strike) बसला आहे. अतिरेकी यासीन मलिकचे म्हणणे आहे की, त्याच्या विचाराधीन असलेल्या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने होत नसल्याने तो उपोषणाला बसला आहे. यासीन मलिकशी बोलण्यासाठी तुरुंगातील वरिष्ठ अधिकारीही आले मात्र त्याने उपोषण सोडण्यास नकार दिला.

तत्पूर्वी, 13 जुलै रोजी, मलिक यांनी माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद (Mufti Mohammad Saeed) यांची मुलगी रुबिया सईद (Rubia Saeed) हिच्या अपहरणाशी संबंधित प्रकरणातील साक्षीदारांची उलटतपासणी करण्यासाठी दिल्लीतील विशेष न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. ही परवानगी न मिळाल्यास बेमुदत उपोषण करणार असल्याचे मलिकने सांगितले होते.