रात्री झोपेत पायाला गोळे येतात ? हि आहेत कारणे ….

हे काही सोपे उपाय ...

पायात होते येणे किंवा ह्यालाच चार्ली हाॅर्स असे देखील म्हणतात . विशेष करून गोळे येणे उतारवयात सुरू होते परंतु सध्या जसे कोणत्याही आजाराला वय राहिले नाही तसेच गोळे काही जणांसाठी नेहेमीचेच झाले असतील . गोळे येणे म्हणजे नक्की काय तर तर पायाच्या पोटरीच्या भागात काही मिनिटे तीव्र वेदना होतात .
पोटरीचे स्नायू शरिरातील सर्वात घट्ट आणि मजबूत असतात. रोजच्या धावपळी मध्ये आपण काळजी घेत नसल्याने पोटऱ्यांवर फार ताण पडतो. जसे वय वाढते तशी स्नायूंची ताकद आणी प्रतिकार क्षमता कमी होते. गोळेयेणे ही आपल्या शरीराची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. काही जणांना यातून काही वेळाने अराम मिळतो पण काही जणांना पायातला गोळा काढावाच लागतो . आता तुम्ही म्हणाल पायातला गोळा काढायचा कसा , तर मग पाहुयात काही सोपे उपाय ज्यामुळे तात्काळ या पोटरीतल्या गोळ्यांपासून तुम्हाला अराम मिळेल .

१. अधिक घट्ट पॅन्ट वापरात असाल आणि तुम्हाला पायात गोळे येत असतील तर ते बंद करा .
२. पॅन्टच्या खिशात जास्त वस्तू ठेऊ नका . उदा . पैशाचे पाकीट , मोबाईल इत्यादी . त्यामुळे बसताना पायाच्या शिरांवर टॅन पडतो किंवा शीर दाबली जाऊ शकते . जर तुमचा पाय देखील दुखत असें तर लगेचच पॅन्टच्या खाष्ट वस्तू ठेवणे बंद करा .
३ . वयोमानानुसार आणि गरजेनुसार गाडी चालावा . अधिक काळ बसून गाडी चालवणे , सतत गियर बदलणे यामुळे देखील त्रास संभवू शकतो .
४ . पायाचे हलके व्यायाम करा . रोज १ किलोमीटर तरी चालाच .
५ . जेव्हा गोळा येतो तेव्हा तो काढण्यासाठी किंवा उतरवण्यासाठी तेलाच्या हाताने किंवा अगदी नुसत्या हाताने जिथे गोळा आहे तेथून खायच्या दिशेने मालिश करा . मालिश करणाऱ्याला हाताला गोळा जाणवत असतो . जो पर्यंत गोळा पूर्णपणे खाली सरकला नाही असे वाटत नाही तोपर्यंत खालच्या दिशेने मालिश करत राहावी . आराम मिळेल .
६ . अधिक काळ उभे राहणे टाळा . जर उंच टाचेच्या चपला वापरात असाल तर प्रसंगापुरते वापर , रोज घालू नका .
७ . जर गोळे येणे सारखेच होत असेंन तर रात्री झोपताना तेलाने मालिश करून झोपावे . त्यासाठी कोणतेही तेल घेऊन गुडघ्यापासून पायाच्या तळव्यांना देखील मसाज करा .