ऐतिहासिक! आरसीबीने पहिल्यांदाच जिंकली आयपीएल ट्रॉफी, दिल्लीला ८ विकेट्सनी दिली मात

RCB vs DC: दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झालेला वुमेन्स प्रीमियर लीगचा अंतिम सामना अतिशय रोमांचक राहिला. स्म्रीती मंधानाच्या नेतृत्त्वाखालील आरसीबीने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीत शानदार खेळ दाखवत ८ विकेट्सने सामना जिंकला. या विजयासह आरसीबीने पहिल्यांदाच डब्ल्यूपीएलचा चषक उंचावला आहे. विशेष म्हणजे, आयपीएलच्या आजवरच्या १६ हंगामातही पुरुषांचा आरसीबी संघ आयपीएल ट्रॉफी जिंकू शकलेला नाही. मात्र पोरींच्या संघाने हा मान मिळवला आहे.

या सामन्यात दिल्लीच्या ११४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अष्टपैलू एलिसा पेरीने ३५ धावांची धडाकेबाज खेळी केली. या खेळीदरम्यान तिने ४ चौकार मारले. तिच्या विजयी चौकारासह आरसीबीने सामना जिंकला. तसेच कर्णधार स्म्रीती मंधानाच्या ३१ धावा आणि सोफी डिवाइनच्या ३२ धावांचाही विजयात महत्त्वाचा वाटा राहिला. शिवाय रिचा घोषची १७ धावांची खेळीही विजयासाठी महत्त्वपूर्ण ठरली.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना दिल्लीकडून शेफाली वर्माला वगळता इतर कोणतीही फलंदाज विशेष खेळ दाखवू शकली नाही. शेफाली २७ चेंडूत ४४ धावांची धडाकेबाज खेळी करून बाद झाली. आरसीबीकडून या डावात सोफी मोल्यूनीने कमाल केली. तिने ३ महत्वपूर्ण विकेट्स काढल्या. तसेच श्रेयांका पाटीलनेही ४ विकेट्सचे योगदान दिले.

महत्वाच्या बातम्या-

Loksabha Election Dates : महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका; कोणत्या तारखेला कुठे मतदान?

निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यावर कोणत्या गोष्टींवर बंदी घालण्यात येते? जाणून घ्या सर्वकाही

मनसेतून राजीनामा देऊनही उपयोग झाला नाही, वसंत मोरे यांचं खासदार बनण्याचं स्वप्न फक्त स्वप्नच राहणार?