Dolly Chaiwala | “मला बिल गेट्स कोण आहेत, हेच माहिती नव्हतं”, डॉली चायवाल्याच्या वक्तव्याच्या चर्चा

Dolly Chaiwala : मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यामध्ये ते डॉलीच्या चहाचा आनंद घेताना दिसत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओ ने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. डॉलीला या व्हिडीओबद्दल विचारले असता त्याने यावर मजेशीर प्रतिक्रिया दिली. खरे तर त्याला बिल गेट्स कोण हे माहीत नव्हते? त्याला दुसऱ्या दिवशी गेट्सबद्दल कळल्याचे त्याने सांगितले आहे.

डॉली चायवाला (Dolly Chaiwala) म्हणाला, “मला अजिबात कल्पना नव्हती, मला वाटले की तो परदेशी आहे म्हणून मी त्याला चहा सर्व्ह केला. दुसऱ्या दिवशी मी नागपुरात परतल्यावर मला कळले की मी कोणाला चहा दिला आहे. तो (बिल गेट्स) म्हणाला, ‘वाह, डॉलीचा चहा.’ आम्ही अजिबात बोललो नाही, तो माझ्या जवळ उभा होता आणि मी माझ्या कामात व्यस्त होतो. मी साऊथचे चित्रपट पाहतो आणि त्यांच्याकडून स्टाईल शिकलोय… आज मला वाटतं की मी ‘नागपूरचा डॉली चायवाला’ झालोय. भविष्यात मला पंतप्रधान नरेंद्र मोदींना चहा पाजण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.”

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

Manoj Jarange Patil | मविआकडून जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवणार? मनोज जरांगे पाटील म्हणाले…

Ajit Pawar | ‘त्या’ प्रकरणात कोणालाही पाठिशी घालणार नाही; अजित पवार यांची विधानसभेत ग्वाही

Ashish Shelar | कोकणातील आंबा काजु उत्पादकांवर अन्याय का? आशिष शेलार यांचा सवाल