Share Market: 2023 मधील असे शेअर्स ज्यांनी गुंतवणूकदारांना श्रीमंत केले

Share Market: भारतीय शेअर बाजारासाठी 2023 हे वर्ष खूप चांगले गेले. गुंतवणूकदारांनी बाजारात भरपूर पैसा कमावला आहे आणि अनेक समभागांनी गुंतवणूकदारांना अनेक पट परतावा दिला आहे. स्मॉल कॅप आणि मिडकॅप शेअर्समध्ये यंदा प्रचंड वाढ झाली आहे. NSE च्या निफ्टी स्मॉल कॅप निर्देशांकाने यावर्षी सुमारे 56 टक्के परतावा दिला आहे. त्याच वेळी, निफ्टी मिड कॅप निर्देशांक 2023 मध्ये सुमारे 46 टक्क्यांनी वाढला आहे आणि लार्ज कॅप निर्देशांक निफ्टी 50 सुमारे 20 टक्क्यांनी वाढला आहे.

परताव्यावर नजर टाकली तर या वर्षी छोट्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. 2023 मध्ये, BSE ने 316 टक्के, Apar Industries 241 टक्के, NLC India 192 टक्के, Zensar Tech 186 टक्के, CYIENT 176 टक्के, SJVN 163 टक्के, बिर्ला सॉफ्ट 145 टक्के आणि MRPL 141 टक्के गुंतवणूकदारांना परतावा दिला आहे.

निफ्टी मिड कॅप समभागांमध्ये, REC लिमिटेड (261 टक्के) ने सर्वाधिक 216 टक्के परतावा दिला आहे. IRFC 196 टक्के, Mazagon Dock 185 टक्के, PFC 179 टक्के, RVNL 165 टक्के, प्रेस्टीज 157 टक्के, भेल 150 टक्के, अरबिंदो फार्मा 147 टक्के, FACT 150 टक्के आणि KPIT Tech ने 115 टक्के परतावा दिला आहे.

निफ्टीच्या लार्ज कॅप समभागांपैकी टाटा मोटर्सने जवळपास 100 टक्के सर्वाधिक परतावा दिला आहे. यानंतर एनटीपीसीने 89 टक्के, बजाजा ऑटोने 86 टक्के, कोल इंडियाने 70 टक्के, एलअँडटी 65 टक्के, हिरो मोटोकॉर्पने 54 टक्के, अल्ट्राटेक सिमेंटने 47 टक्के आणि एलटीआय माइंडट्रीने 44.25 टक्के परतावा दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘शेतकऱ्यांचं कंबरडे मोडण्याच पाप हे केंद्र सरकारने आणि ट्रिपल इंजिनच्या सरकारने केलेले आहे’

आमचं सरकार आल्यावर सरसकट कर्जमाफी होईल; खासदार सुप्रिया सुळे यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

‘देवेंद्र फडणवीस केवळ आकडेवारी फेकतात, पण सत्य परिस्थिती ते जनतेपासून लपवतात’