Anant-Radhika Pre-Wedding | अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये परफॉर्म करण्यासाठी रिहाना किती पैसे घेतेय? रक्कम जाणून बसेल धक्का

Anant-Radhika Pre-Wedding – भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या (Anant Ambani) लग्नाआधी आलिशान कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत. प्रसिद्ध उद्योगपतीच्या लग्नाआधीच्या सोहळ्यासाठी अनेक बॉलिवूड आणि हॉलिवूड सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आले आहे.

1 मार्च 2024 पासून सुरू झालेल्या प्री-वेडिंग सोहळ्याला (Anant-Radhika Pre-Wedding) सर्व मोठ्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली आणि या कार्यक्रमात जिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले ती पॉप गायिका रिहाना आहे. राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमात हॉलिवूडची लोकप्रिय गायिका रिहानाला आमंत्रित करण्यात आले आहे.

\https://youtu.be/nHXEm4UhYt0

रिहानाने किती शुल्क आकारले?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पॉप स्टार रिहाना एका परफॉर्मन्ससाठी सुमारे $8-$9 मिलियन (रु. 66 ते 74 कोटी) आकारले आहेत. ही रक्कम निश्चितच लोकांची झोप उडवणारी आहे. उत्सवाची सुरुवात 1 मार्चपासून ‘ॲन इव्हनिंग इन एव्हरलँड’ या भव्य कार्यक्रमाने होईल. रिहाना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी एक दिवस आधी 29 फेब्रुवारीला जामनगरला पोहोचली होती. दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये गायिका रिहाना विमानतळावरून बाहेर पडताना दिसत आहे. तिने काळ्या रंगाच्या टॉपसह जांभळ्या रंगाची पँट घातली होती.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

Manoj Jarange Patil | मविआकडून जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवणार? मनोज जरांगे पाटील म्हणाले…

Ajit Pawar | ‘त्या’ प्रकरणात कोणालाही पाठिशी घालणार नाही; अजित पवार यांची विधानसभेत ग्वाही

Ashish Shelar | कोकणातील आंबा काजु उत्पादकांवर अन्याय का? आशिष शेलार यांचा सवाल