डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढल्या, ‘या’ प्रकरणात होऊ शकते २० वर्षांची शिक्षा

Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधून बाहेर पडल्यानंतर, अमेरिकेचे गोपनीय दस्तऐवज बेकायदेशीरपणे ठेवल्याच्या मार-ए-लागो दस्तऐवज प्रकरणात त्यांना 37 गुन्ह्यांमध्ये दोषी ठरविण्यात आलं आहे.

जानेवारी 2021 मध्ये व्हाईट हाउस सोडल्यानंतर ट्रंप काही गोपनीय दस्तऐवज आपल्यासोबत घेऊन गेल्याचं न्याय विभागानं म्हटलं आहे. यामध्ये अण्वस्त्र आणि शस्त्रास्त्र कार्यक्रम आणि संरक्षण योजनांची कागदपत्र आहेत. त्यामुळे त्यांच्यावर राष्ट्रीय संरक्षण माहिती राखून ठेवणं, न्यायात अडथळा आणणं, कागदपत्र लपवणं आणि खोटी विधानं करणं आदी आरोपांचा समावेश आहे.

न्याय विभागाचे विशेष वकील जॅक स्मिथ यांनी केलेल्या आरोपांनुसार, प्रत्येक आरोपासाठी 20 वर्षांची शिक्षा होऊ शकते. तसंच कागदपत्रं लपवण्यासाठी ट्रंप याना मदत करणारे सहाय्यक वॉल्ट नौटा यांना सहा गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवण्यात आलं आहे.