ऑलंम्पिकमध्ये कुस्तीत सुवर्ण पदक जिकण्यांचे स्वप्न – सिंकदर शेख

- पुनीत बालन ग्रुप देणार पाठबळ - बालन यांच्या हस्ते सत्कार

Sikandar Shaikh: महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) कुस्ती जिकल्यानंतर आता मला हिंद केसरी (Hind Kesari) व्हायचे आहे. पण त्यापुढे जाऊन मला ऑलम्पिक स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक मिळविण्याचे माझे स्वप्न आहे. पुनीत बालन ग्रुपने मला सर्व सहकार्य करण्याचे जाहीर केले असून त्यामुळे मी नक्कीच ऑलम्पिकमध्ये पदक मिळवेल असा विश्वास महाराष्ट्र केसरी विजेता सिकंदर शेख यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत विजेते ठरलेल्या सिकंदर शेखचा युवा उद्योजक पुनीत बालन यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी माध्यमांशी बोलताना शेख म्हणाला, सलग तीन वर्ष प्रयत्न करूनही मला महाराष्ट्र केसरी किताबापासून दुर रहावं लागलं होत. यावेळेस मात्र महाराष्ट्र केसरीची गदा जिकायचीच होती. त्यामुळे या स्पर्धेकडे मी पुर्ण लक्ष केंद्रित केले होते. अखेर ही गदा मी जिंकली. आता मला हिंद केसरी स्पर्धा जिंकायची आहे. पण त्यापुढे जाऊन मला ऑलम्पिक स्पर्धेत सहभागी जाऊन सुवर्ण पदक मिळवायचे आहे. पुनीत बालन ग्रुपने त्यासाठी मला सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. पुनीत बालन यांनी अनेक खेळांना आणि खेळाडूना मदत केली आहे. खेळाडूंच्या पाठीशी ते सतत उभे असतात. त्यांनी दिलेला शब्द ते पूर्ण करतील. त्यांच्या पाठिंब्याने मी नक्कीच आपल्या देशासाठी ऑलंम्पिकमध्ये पदक मिळवेल असे शेख याने सांगितले.

महत्वाच्या बातम्या-

बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

Maratha Reservation: अजित पवारांकडून आमदार, खासदारांना दिल्या गेल्या ‘या’ खास सूचना

२०१९ सालच्या निवडणुकीत ‘या’ दोन उमेदवारांना होता ओव्हर कॉन्फिडन्स; कार्यकर्त्यांची झाली होती मोठी निराशा