मराठवाड्याच्या हक्काचे पाणी विनाविलंब सोडा!: अशोकराव चव्हाण

Ashok Chavan: उत्तर महाराष्ट्रातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली नसल्याने राज्य सरकारने मराठवाड्याच्या हक्काचे पाणी विनाविलंब सोडावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर समाजमाध्यमावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, उत्तर महाराष्ट्राच्या धरणांमधून जायकवाडीत पाणी सोडण्याप्रकरणी मा. सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीमध्ये पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे जायकवाडीला ८.६ टीएमसी पाणी सोडण्याचा २० ऑक्टोबर २०२३ रोजीचा गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचा निर्णय कायम आहे. आज मराठवाड्यामध्ये तीव्र पाणी टंचाई आहे, शेतकरी अडचणीत आहेत, पिकांची परिस्थिती बिकट झाली आहे. शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत. या पार्श्वभूमिवर राज्य सरकारने मराठवाड्याच्या हक्काचे पाणी विनाविलंब सोडण्याचा निर्णय घ्यावा, अशी माझी मागणी आहे.

महत्वाच्या बातम्या-

बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

Maratha Reservation: अजित पवारांकडून आमदार, खासदारांना दिल्या गेल्या ‘या’ खास सूचना

२०१९ सालच्या निवडणुकीत ‘या’ दोन उमेदवारांना होता ओव्हर कॉन्फिडन्स; कार्यकर्त्यांची झाली होती मोठी निराशा