सत्ताधारी प्रचारात आकंठ बुडालेत आणि तरुण बेरोजगारीच्या नैराश्यात; जयंत पाटील यांचा हल्लाबोल

Jayant Patil :- वाढती बेरोजगारी (Unemployment) आणि बिघडलेल्या अर्थव्यवस्थेवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सत्ताधारी भाजपला (BJP) चांगलेच धारेवर धरले आहे. एकीकडे देशात वेगवेगळ्या राज्यातील निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे, सत्ताधारी पक्षाचे नेते प्रचारात आकंठ बुडाले आहेत, दुसरीकडे मात्र भारतातील बेरोजगारी देखील शिगेला पोहचली असून देशातील युवा बेरोजगारीच्या नैराश्यात आकंठ बुडाला आहे अशी टीका त्यांनी केली.

सेंटर फॉर मॉनिटरींग इकोनॉमीच्या नुकत्याच प्रसिद्ध अहवालानुसार देशातील बेरोजगारीचा दर गेल्या दोन वर्षांतील उच्चांकी म्हणजे १०.०५ टक्क्यांवर पोहोचला आहे. यावर जयंत पाटील यांनी ही प्रतिक्रिया आपल्या एक्स अकाऊंटवरून दिली आहे.

पुढे ते म्हणाले की, एकीकडे देशाची अर्थव्यवस्था वाढत असल्याचा दावा केला जात असताना दुसरीकडे मात्र बेरोजगारी देखील वाढत आहे. हे चित्र विरोधाभासी आहे. बेरोजगारी वाढत असल्याने देशाची अर्थव्यवस्था वाढत असल्याचा केंद्र सरकार व भाजपा नेत्यांचा दावा सपशेल खोटा ठरत आहे.

महत्वाचे बातम्या-

ते सर्वजण प्लॅनिंग करून माझ्या जीविताला हानी करण्याच्या हेतूने आले होते; प्रकाश सोळंके यांनी सांगितली आपबीती

मनोज जरांगे पाटील आणि सकल मराठा समाजाला मुख्यमंत्र्यांनी दिले धन्यवाद; म्हणाले,….

राज्य सरकारला 2 जानेवारीची डेडलाईन; अखेर मनोज जरांगे यांचं उपोषण मागे